काकडी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे.मध्यम आकाराची सोललेली काकडी खाल्ल्याने तुम्हाला जीवनसत्त्वे मिळतात.हे एक आवश्यक पोषक तत्व आहे जे रक्त गोठणे, हाडांचे मेटाबॉलिज्म आणि रक्तातील कॅल्शियम पातळी नियंत्रित करण्यासाठी आवश्यक आहे. तसंच, त्यात व्हिटॅमिन सी देखील असते जे तुमची प्रतिकारशक्ती वाढवते, आणि कोलेजन तयार करण्यात मदत करते. ज्यामुळे तुमची हाडे, केस आणि त्वचा मजबूत राहतात.त्याचप्रमाणे काकडीच्या बिया बद्धकोष्ठतेशी लढण्यास मदत करतात. या बिया मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर असतात आणि त्यात प्रतिजैविकांचे प्रमाण चांगले असते. वजन आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही त्याचा आहारात समावेश करू शकता.मात्र, यासोबतच तुम्हाला चांगला आहार आणि व्यायामाची दिनचर्या देखील पाळावी लागेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काकडीने वजन कसे कमी करावे

वजन कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ज्या कॅलरीज तुम्ही बर्न करत आहात त्यापेक्षा कमी कॅलरी खाणे. काकडीसारख्या खाद्यपदार्थांमध्ये कॅलरीज कमी असतात आणि त्यामुळे कमी कॅलरीज खाण्यास मदत होते.
काकडीच्या कॅलरीजच्या प्रमाणाबद्दल बोलायला गेलं तर, एक कप चिरलेल्या काकडीत फक्त १४ कॅलरीज असतात. दुसरीकडे, मध्यम आकाराच्या काकडीत फक्त २४ कॅलरीज असतात.ज्यामुळे ते कमी घनतेचे अन्न बनते.अशा खाद्यपदार्थांचा आहारात समावेश केल्याने वजन कमी होण्यास मदत होते कारण त्यात कमी कॅलरीज असतात.

वजन कमी करण्यासाठी काकडी कशी खावी

१) काकडीची कोशिंबीर

काकडी सॅलडच्या रूपात खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते.अशा प्रकारे, जास्त खाणे टाळा.चवदार सॅलड बनवण्यासाठी तुम्ही टोमॅटो, काकडी, मुळा, गाजर काही कांद्याचा रस आणि चवीनुसार मीठ मिसळून खाऊ शकता.तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सॅलडमध्ये शिमला मिरचीचाही समावेश करू शकता.

२) काकडीचे पाणी

ताजे काकडीचे पेय बनवण्यासाठी काकडीचे तुकडे करून त्यात पुदिन्याची पाने, तुळशीची पाने आणि थोडे लिंबू घालून चांगले मिसळा.हे शरीर डिटॉक्सिंगसाठी देखील उपयुक्त आहे.

काकडी केव्हा आणि कशी खावी

काकडीत ९५ टक्के पाणी असते.त्यामुळे काकडी खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये.जर तुम्ही असे केले तर तुम्हाला पोटदुखी होऊ शकते आणि याशिवाय त्यातील पोषक तत्वे देखील पातळ होतात.झोपेच्या आधी काकडी खाऊ नका याची काळजी घ्या कारण त्यामुळे सूज येऊ शकते.दुसरीकडे, रात्री ते खाल्ल्याने तुमची झोप खराब होऊ शकते

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cucumber is useful for weight loss learn when and how to eat