Tamarind For Skin Care: चिंच म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं. चिंच आंबट असली तरीही, आवडीने खाल्ली जाते. चिंचेचा उपयोग आपण प्रामुख्याने जेवणात करतो. चिंचेच्या आंबटपणामुळे जेवणाला एक विशिष्ट चव येते. चिंचेचे अनेक उपयोग आहेत. मात्र, चेहऱ्यासाठी देखील चिंचेचा वापर केला जातो हे मात्र तुम्ही पहिल्यांदा ऐकलं असेल. होय, चिंच चेहऱ्यासाठी देखील लाभकारक आहे. चिंचेच्या लगद्यामध्ये अल्फा हायड्रॉक्सी ऍसिड (AHAs) असतात, जे त्यांच्या एक्सफोलिएटिंग गुणधर्मांसाठी ओळखले जातात. हे तुमच्या त्वचेवर वृद्धत्वविरोधी प्रभाव देतात. चिंचेमध्ये अँटिऑक्सिडंट असतात जे तुमच्या त्वचेला हानिकारक फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात. तर जाणून घ्या त्वचेची काळजी घेण्यासाठी चिंचेचा वापर कशाप्रकारे करता येऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१) फेस वॉश

साहित्य

हा फेस वॉश बनवण्यासाठी तुम्हाला १ टीस्पून चिंचेचा कोळ, १ टीस्पून दही आणि १ टीस्पून गुलाबजल आवश्यक आहे.

कसे बनवाल?

हा फेस वॉश बनविण्यासाठी एक स्वच्छ भांडे घ्या आणि त्यात वरील सर्व साहित्य टाका आणि ते एकत्र चांगले मिसळा. यानंतर हा मास्क तुमच्या चेहऱ्यावर लावा. हा मास्क तुमच्या चेहऱ्यावर किमान १५ ते २० मिनिटे राहू द्या आणि त्यानंतर धुवून टाका. या फेस वॉशचा वापर केल्याने तुमची त्वचा हायड्रेट आणि स्वच्छ होण्यास मदत होईल.

( हे ही वाचा: फणस खायला आवडतो का?; जाणून घ्या त्याचे आरोग्यासाठी असणारे आश्चर्यकारक फायदे)

२) फेस स्क्रब

साहित्य

हा स्क्रब करण्यासाठी, तुम्हाला २ चमचे चिंचेचा कोळ, २ चमचे ब्राऊन शुगर, २ चमचे लिंबाचा रस, २ चमचे बेकिंग सोडा आवश्यक आहे.

कसे बनवावे?

हा स्क्रब बनवण्यासाठी एका भांड्यात सर्व साहित्य एकत्र करून चांगली पेस्ट बनवा. त्यानंतर अंघोळ करते वेळी तुमचा चेहरा आणि मान एक्सफोलिएट करण्यासाठी हा बनविलेला स्क्रब त्याजागी लावा आणि २ मिनिटे हलक्या हाताने हळुवार मसाज करा. याचा वापर तुम्ही बॉडी स्क्रब म्हणून देखील करू शकता.

३) टोनर

साहित्य

हे करण्यासाठी १ कप चिंच आणि २ चमचे चहाची पाने आवश्यक आहेत.

कसे बनवाल?

हा टोनर बनविण्यासाठी चिंच घ्या आणि दोन कप पाण्यात ४ ते ५ मिनिटे उकळा. त्यानंतर याचे पाणी काढून घ्या. नंतर चहाची पाने घ्या आणि पाण्यात २ ते ३ मिनिटे उकळा आणि चहाचे पाणी गाळून घ्या. चहा आणि चिंचेचे पाणी दोन्ही मिक्स करून स्प्रे बाटलीत भरा. चेहऱ्यावर टोनर लावण्यासाठी कॉटन पॅडचा वापर करा.

( हे ही वाचा: चेहऱ्यावरील नको असलेले केस काढण्यासाठी तांदळाच्या पिठाचा वापर करा; पार्लरमध्ये जाण्याची गरज पडणार नाही)

४) फेस मास्क

साहित्य

फेस मास्क बनविण्यासाठी तुम्हाला १ कप चिंच, १/२ कप पांढरा तांदूळ आणि १ चमचा ऑलिव्ह ऑइल आवश्यक आहे.

कसे बनवावे?

हा फेस पॅक बनविण्यासाठी चिंचेचा कोळ काढा आणि कच्च्या तांदूळ बरोबर तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या. नंतर हे मिश्रण ग्राइंडरमध्ये घालून पेस्ट होईपर्यंत बारीक करा. यानंतर मिश्रणात ऑलिव्ह ऑईल घाला आणि चांगले मिसळा. नंतर हा मास्क तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि किमान १५ ते २० मिनिटे प्रतीक्षा करा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Use tamarind with these methods to get beautiful skin get amazing benefits gps
First published on: 27-06-2022 at 19:18 IST