शहापूर तालुक्यातील खुटघर येथे सातवीमध्ये शिकणाऱ्या सोहम सणस या तेरा वर्षीय विद्यार्थ्यांने अभ्यासाला कंटाळून भातसा नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.  शहापूर तालुक्यातील पी.एस.देशमुख इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सातवीत  शिकणारा सोहम गुरुवारी संध्याकाळ झाली तरी घरी परतला नव्हता, मात्र त्याचे दप्तर घरातच होते. यावेळी त्याच्या आईने दप्तराची तपासणी केली असता त्यामध्ये ‘तुम्ही मला चांगले शिकवले, मी आता जग सोडून जातो, तुम्ही नाराज होऊ नका’ अशी चिठ्ठी आढळून आली. यानंतर लगेचच सोहमच्या पालकांनी शहापूर पोलिसांकडे धाव घेऊन तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी ११च्या सुमारास खुटघर स्मशानभूमीसमोर भातसा नदीच्या पात्रात सोहमचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. यानंतर लगेच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. याबाबत शहापूर पोलीस अधिक तपास करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 7th standard student did suicide due tiredness of study