लोकसत्ता प्रतिनिधी
सोलापूर : व्होट जिहाद-धर्मयुद्ध हे विधानसभा निवडणूक आचारसंहितेत बसते का ? असा सवाल शिवसेनेचे (उद्धव ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे बोलताना केला. तसेच राज्यात सध्या लोकप्रिय झालेल्या लाडक्या बहीण योजनेवरील पैसे सत्ताधारी काही खिशातून देत नसल्याची टीकाही ठाकरे यांनी या वेळी केली. बार्शीतील पक्षाचे उमेदवार दिलीप सोपल यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ठाकरे बोलत होते.
आणखी वाचा-सोलापुरात ठाकरे गटाचा काँग्रेसवर बहिष्कार
ठाकरे म्हणाले, की आमचे हिंदुत्व चूल पेटवणारे आहे, कोणाची घरे पेटवणारे नाही. मोदी-शहा यांनी महाराष्ट्र व गुजरात वादाची भिंत बांधली आहे. गद्दार विकले गेले तरी निष्ठा कधीही विकली जात नसते. सत्तेसाठी गद्दारी करून दिल्लीपुढे मिंधे होणाऱ्यांना विधानसभा निवडणुकीत जनता माफ करणार नाही, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. व्होट जिहाद-धर्मयुद्ध हे विधानसभा निवडणूक आचारसंहितेत बसते का ? दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा तुम्हीच आरोप केलेला माणूस तुमच्या महायुतीचा उमेदवार असला तरी कसा चालतो, असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला.
© The Indian Express (P) Ltd