गेल्या अनेक दिवसांपासून मानधनात वाढ करण्याची कोलवातल कर्मचाऱ्यांच्या मागणीला यश आले आहे. कोतवाल कर्मचाऱ्यांनी सतत केलेल्या आंदोलनाची दखल राज्य सरकारने घेतली आहे. आज मंगळवारी राज्य सरकारने कोतवालांच्या मानधनात दोन हजार ५०० रूपयांनी वाढ केली आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे कोतवालांना ५ हजार रूपयांऐवजी ७ हजार ५०० रूपये वेतन मिळणार आहे. ड वर्गात काम करणार्या कोतवालांसारख्या कर्मचाऱ्यांनाही त्यांची पूर्ण नियुक्ती होईपर्यंत १५ हजार रूपयांचे मानधन देणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यभरात १२ हजार कोतवाल कार्यरत आहेत. तर ६ हजार कोतवालांची पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. ज्या कोलवाल कर्मचाऱ्यांची सेवा १० ते २० वर्ष जाली आहे. अशांना मानधनात ३ टक्के वाढ देण्यात आली आहे. ज्या कोतवालांची सेवा २० ते ३० वर्ष झाली आहे त्यांच्या मानधनात ४ टक्के वाढ करण्यात आली आहे. तर ज्यांची सेवा ३१ वर्षापेक्षा जास्त झाली अशा कोतवालांच्या मानधनात टक्के वाढ करण्यात आली आहे. ज्या कोतवालांची ५० वर्षे सेवा झाली आहे त्यांना १५ हजार मानधन देण्यात येणार आहे.

याशिवाय कोतवाल कर्मचाऱ्यांना अपघात विम्याचे संरक्षणही देण्यात येणार आहे. अटल निवृत्ती योजनेमध्येही कोतवालांचा समावेश करण्यात येणार असून सर्व पैसे राज्य सरकार भरणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kotwal salary increase 2500 rupees