राज्य विधिमंडळाचे आज, सोमवारपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन हे मुख्यत: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सिंचनाची श्वेतपत्रिका याभोवती फिरणार आहे. विरोधकांनी अजितदादांच्या विरोधात आक्रमक होण्याचा इशारा दिला असतानाच सभागृहात विरोधकांना दाखवूनच देतो, असे आव्हानच अजितदादांनी दिले आहे. दुसरीकडे, अविश्वास ठराव मांडण्याच्या मुद्दय़ावरून शिवसेना एकाकी पडली असून, यावरून विरोधकांच्या ऐक्यालाच सुरुंग लागल्याचे चित्र रविवारी दिसून आले.
मुख्यमंत्र्यांच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची परंपरा या वेळीही विरोधकांनी कायम ठेवली आहे. सिंचनाच्या श्वेतपत्रिकेवर आक्रमक होण्याचे संकेत विरोधी पक्षांनी दिले असून, भाजपने रविवारी सरकारच्या श्वेतपत्रिकेचा पंचनामा करणारी ‘काळी पत्रिका’ प्रसिद्ध केली. त्यात सरकारच्या आकडेवारीत कशी विसंगती आहे हे दाखवून देण्यात आले आहे. सिंचनाच्या श्वेतपत्रिकेबरोबरच वीज भारनिमयन, टोल, कायदा आणि सुव्यवस्था यावरून सरकारची व प्रामुख्याने राष्ट्रवादीची कोंडी करण्याची भाजपची योजना आहे. मात्र विरोधकांतील समन्वयचा अभाव अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच दिसून आला. सरकारच्या विरोधात अविश्वासाचा ठराव शिवसेनेने दाखल केला असतानाच मनसेने पाठिंबा देणार नाही, असे जाहीर केले.
मुख्य विरोधी पक्ष भाजपनेही नंतर बघू, असे सांगत शिवसेनेला एकाकी पाडले. शिवसेना मात्र अविश्वासाच्या ठरावावर ठाम आहे.
सभागृहात दाखवून देतो अजित पवारांचेहीविरोधकांना खुले आव्हान
संग्रहित लेख, दिनांक 10th Dec 2012 रोजी प्रकाशित
विरोधकांच्या ऐक्याला सुरूंग!
राज्य विधिमंडळाचे आज, सोमवारपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन हे मुख्यत: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सिंचनाची श्वेतपत्रिका याभोवती फिरणार आहे. विरोधकांनी अजितदादांच्या विरोधात आक्रमक होण्याचा इशारा दिला असतानाच सभागृहात विरोधकांना दाखवूनच देतो, असे आव्हानच अजितदादांनी दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 10-12-2012 at 01:22 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposition unity break in nagpur winter session