अलिबागमधील तळकरनगर परिसरातून ११ संशयित बांगलादेशींना रायगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये तीन महिलांचाही समावेश आहे. रायगड जिल्ह्य़ातील विविध परिसरात तब्बल ८०० ते ९०० बांगलादेशी घुसखोर शिरल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अलिबाग, पेण, रोहा, माणगाव, म्हसळा, महाड, रसायनी, खालापूर, खोपोली, कर्जत आणि म्हसळा या परिसरात या बांगलादेशींचे वास्तव्य असल्याचे समोर आले आहे.
ही बाब लक्षात घेऊन रायगड पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरविरोधी पथकाची स्थापना केली आहे. या पथकाने मंगळवारी अलिबाग शहरातील तळकरनगर परिसरात धाड टाकून ४२ जणांना ताब्यात घेतले. यात बिहारमधील २४, उत्तर प्रदेशमधील ५, मध्य प्रदेशमधील २ तर पश्चिम बंगालमधील ११ जणांचा समावेश होता. बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमधून आलेल्या ंकडे भारतीय नागरिकत्वाचे दाखले आढळले.तर पश्चिम बंगालमधून आल्याचे सांगणाऱ्या या ११ जणांकडे भारतीय नागरिकत्वाचे कोणताही पुरावा नव्हता.
संग्रहित लेख, दिनांक 6th Mar 2013 रोजी प्रकाशित
रायगडमध्ये ११ संशयित बांगलादेशी पोलिसांच्या ताब्यात
अलिबागमधील तळकरनगर परिसरातून ११ संशयित बांगलादेशींना रायगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये तीन महिलांचाही समावेश आहे. रायगड जिल्ह्य़ातील विविध परिसरात तब्बल ८०० ते ९०० बांगलादेशी घुसखोर शिरल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 06-03-2013 at 02:19 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suspected bangladeshi arrested in alibaug