सांगली : शहरातील कॉलेज कॉर्नर येथे झालेल्या किरकोळ वादातून महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा बुधवारी सायंकाळी तीक्ष्ण हत्याराने भोसकून खून करण्यात आला. या खून प्रकरणी तीन तरुणांना गुरुवारी अटक करण्यात आली. अजित अंगडगेरी (१९) या तरुणाचा काल सायंकाळी कर्नाळ रोडवर भोसकून खून करण्यात आला होता. त्याला शेतातून बोलावून नेऊन हत्या करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीच्या आधाराने पोलीसांनी सुफियना बागवान (१९), सुजित शिंदे (२०) आणि सौरभ वाघमारे (१९) या तिघांना गुरुवारी अटक करण्यात आली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 29-09-2022 at 21:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three youths arrested in college student murder case zws