अभिनेत्री सुष्मिता सेनची ‘आर्या’ ही वेब सीरिज प्रचंड गाजली होती. आता या सीरिजचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘आर्या २’ या वेब सीरिजचा नुकताच टीझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे. या सिझनमध्ये सुष्मिता एका वेगळ्या रुपात दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२० सेकंदाच्या टीझरमध्ये सुष्मिता सेन एकदम वेगळ्या अंदाजात दिसत आहे. तिच्या संपूर्ण चेहऱ्यावर, अंगावर गुलाल असल्याचे दिसत आहे. तसेच तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. सुष्मिताचा लूक पाहाता तिला प्रचंड राग आला असल्याचे भासत आहे. ‘आर्या २’ लवकरच डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. पण प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर आलेली नाही.
Bigg Boss 15 : वेदना असह्य होऊ लागल्यामुळे राकेश बापट बिग बॉसच्या घरातून बाहेर

सुष्मिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर टीझर शेअर केला आहे. हा टीझर शेअर करत तिने, ‘फर्स्ट लूक खरच खूप मस्त आहे. शेरनी परत येत आहे. यावेळी पहिल्यापेक्षा आणखी खतरनाक. आर्या लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

आर्या ही सुष्मिताची पहिलीच वेबसीरिज होती. या सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या सीरिजमध्ये चंद्रचूड सिंह दिसला होता. या शिवाय सिकंदर खेरचीही यामध्ये महत्त्वाची भूमिका होती. या सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता या सीरिजचा दुसरा सिझन येत असल्यामुळे चाहते उत्सुक असल्याचे पाहायला मिळते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aarya 2 teaser sushmita sen is back for revenge watch video avb