‘दृश्यम’ फेम अभिनेत्री श्रिया सरनने प्रियकर अँड्री कोसचीवशी लग्नगाठ बांधली आहे. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये सुपरहिट ठरलेल्या श्रिया १२ मार्च रोजी रशियन प्रियकर अँड्रीसोबत मुंबईत विवाहबद्ध झाली. मुंबईतील लोखंडवाला इथल्या श्रियाच्या राहत्या घरीच हा लग्नसोहळा पार पडला. हा सोहळा अत्यंत खासगी ठेवण्यात आल्याने दोघांचे कुटुंबीय आणि जवळचा मित्र-परिवारच उपस्थित होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘मिड डे’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार सेलिब्रिटींपैकी फक्त अभिनेता मनोज बाजपेयी आणि त्याची पत्नी शबानाच या लग्नसोहळ्याला उपस्थित होते. हिंदू विवाहपद्धतीनुसार श्रिया आणि अँड्रीने लग्नगाठ बांधली. तर लग्नापूर्वी कुटुंबीय आणि मित्र-परिवारासाठी पार्टीसुद्धा आयोजित करण्यात आली होती.

वाचा : प्रिया वारियरच्या चित्रपटाबाबत झालेल्या ‘त्या’ चर्चा अफवाच

अँड्री हा रशियातील एक प्रसिद्ध व्यावसायिक आहे. डोमावकुस्नी या प्रसिद्ध रेस्तराँचा तो संस्थापक आहे. या रेस्तराँच्या अनेक शाखाही आहेत. याशिवाय अँड्री राष्ट्रीय स्तरावरील टेनिसपटूही आहे. अँड्री रशियात आई आणि भावासोबत सेंट पीटर्सबर्ग येथे राहतो. त्याला २०१५ मध्ये सर्वोत्कृष्ट युवा व्यावसायिकाचा पुरस्कार मिळाला होता. तर श्रियाने बॉलिवूडमध्ये कमी काम केले असले तरी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील ती एक नावाजलेली अभिनेत्री आहे. श्रियाने अनेक तेलुगू, तमिळ, कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After denying marriage reports drishyam fame actress shriya saran ties the knot with beau in mumbai