बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्रानंतर आता कंगना रणौत आणि बिपाशा बासूनेही मेहुल चोक्सीच्या गितांजलीवर गंभीर आरोप केले आहेत. या दोन्ही अभिनेत्रींनी आपल्याला करारानुसार पैसे न दिल्याचा आणि कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. याआधी प्रियांका चोप्राने नीरव मोदी याने आपल्याला फसविल्याच्या कारणावरुन त्याला नोटीस बजावली होती. गितांजली हा नीरव मोदी यांचे मामा मेहुल चोक्सी यांचा नामांकित ब्रँड आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कंगनाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, २०१६ मध्ये गितांजली ब्रॅंडच्या नक्षत्र या दागिन्यांची प्रसिद्धी केली होती. मात्र गितांजली ग्रुपने आपल्या फी दिलेल्या नसल्याचेही त्याने सांगितले. त्यांच्या कंपनीवर अजून बरीच थकबाकी आहे असेही तो म्हणाला. तर बिपाशाच्या म्हणण्यानुसार माझा करार पूर्ण झाल्यानंतरही गितांजलीकडून माझ्या फोटोंचा वापर करण्यात आला. अशाप्रकारे चुकीचे काम केले जाऊ नये यासाठी आमच्याकडून बरेच प्रयत्न करण्यात आले. मात्र तरीही देशातच नाही तर परदेशातही माझे फोटो वापरले गेले. इतकेच नाही तर माझ्या कामाचा मोबदलाही मला वेळेत आणि पूर्ण देण्यात आला नाही. नीरवने डिझाईन केलेले दागिने केट विन्स्लेट, नाओमी वॉटस, कोको रोशा, लिसा हेडन आणि ऐश्वर्या राय यांच्यासारख्या भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्टाईल आयकॉन घालतात. त्यामुळे या ब्रँडला सेलिब्रिटी ब्रँड म्हणून ओळखले जाते.

पंजाब नॅशनल बँकेला ११, ४०० कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या अब्जाधीश हिरे व्यापारी नीरव मोदीविरोधात अभिनेत्री प्रियांका चोप्राने कायदेशीर नोटीस बजावली आहे. जानेवारी २०१७ मध्ये प्रियांका नीरव मोदीच्या जाहिरातींची ब्रँड अॅम्बेसिडर झाली होती. त्यानंतर ती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत नीरव मोदीच्या काही जाहिरातींमध्येही झळकली. मात्र, यासाठी झालेल्या करारानुसार मानधन न मिळाल्याचा ठपका ठेवत प्रियांकाने ही नोटीस बजावली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After priyanka chopra kangana ranaut and bipasha basu accuse gitanjali for not paying full fees