मालिकांच्या सेटवर खूप गमतीजमती घडत असतात. स्टार प्रवाहची ‘लेक माझी लाडकी’ ही मालिकाही त्याला अपवाद नाही. ‘लेक माझी लाडकी’च्या सेटवर नुकतीच सगळ्यांना गोड मेजवानी मिळाली. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी नारळाच्या वड्या करून सर्वांना गोड खाऊ करून दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘लेक माझी लाडकी’ मालिकेच्या सेटच्या परिसरात बरीच नारळाची झाडं आहेत. या झाडांवरून नारळ काढण्यात आले. हे काढलेले नारळ ऐश्वर्या नारकर यांनी पाहिले आणि त्यांना ओल्या नारळाच्या वड्या करायची कल्पना सुचली. ही कल्पना लगेच अंमलातही आली. त्यांच्या सुचनेनुसार सेटवरच नारळाच्या वड्या तयार झाल्या. या छान खमंग गोड वड्यांवर सेटवरच्या सर्वांनी ताव मारला.

VIDEO: ऐन उन्हाळ्यात ‘हिट’ वाढवणारा ‘शिकारी’ चित्रपटाचा ट्रेलर

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या विषयी म्हणाल्या, “आम्ही सेटवर फावल्या वेळात बरीच धमाल करत असतो, खादाडी करत असतो. याआधीही आम्ही मेथांबा, मिसळ असे बरेच पदार्थ केले आहेत. सेटवर नारळ पाहून नारळाच्या वड्या करण्याची कल्पना सुचली आणि लगेच वड्याही केल्या. या वड्या करताना खूप मजा आली. ताज्या वड्या आम्ही सर्वांनी मिळून खाल्ल्या.”

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya narkar made coconut sweet on lek majhi ladki serial set