बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या बिग बॉसच्या प्रोमोमध्ये असे दिसत आहे, सदस्यांची जीपमध्ये बसण्यासाठी धावपळ सुरू आहे आणि जीपमध्ये बसलेले सदस्य आहेत गायत्री, उत्कर्ष, स्नेहा, जय आणि मीरा. जीपमधील सदस्यांनी बहुमताने निवडलेल्या एका सदस्याला जीपमधून उतरावे लागणार आहे. उत्कर्षचं म्हणण आहे स्नेहाने जीपमधून खाली उतरावे. आता स्नेहाला नॉमिनेशनमधून वाचविण्यासाठी जय कोणता डावपेच आखणार? जयची साथ स्नेहाला मिळेल का? जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना बिग बॉस मराठीचा आजचा भाग पाहावा लागणार आहे.
 
याचसोबत स्नेहा आणि आदिशमध्ये आज पुन्हा एकदा वादाची ठिणगी दिसत आहे. आदिशची एण्ट्री झाल्यापासून तो प्रत्येक सदस्याशी हुज्जत घालताना दिसत आहे असे स्नेहाचे आणि इतर सदस्यांचे मत आहे. आदिशच्या येण्याने बिग बॉस मराठीच्या घरामध्ये खळबळ उडाली आहे. सगळेच त्याच्याविषयी तर काही त्याच्या विरोधात बोलू लागले आहेत. बिग बॉसने दिलेल्या कार्यामुळे आदिशबद्दल जय, उत्कर्ष आणि त्यांच्या गृपमध्ये नकारात्मक भावना आहे जी वेळोवेळी दिसून आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका टास्क दरम्यान आदिश स्नेहाकडे चर्चा करायला जाणार आहे. पण, त्या चर्चेचे रूपांतर भांडणामध्ये होणार आहे. आदिशला स्नेहाच्या संतापजनक प्रतिक्रियेचा सामना करावा लागणार आहे असं दिसत आहे. काही ना काही मुद्द्यांवरून आता स्पर्धकांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi 3 sneha wagh and adish vaidya fight video avb