Dadasaheb Phalke iff Awards 2024 Winner List : यंदाचा दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मुंबईत पार पडला आहे. या सोहळ्याला मनोरंजन विश्वातील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. शाहरुख खान, शाहिद कपूर, राणी मुखर्जी, करीना कपूर खान, नयनतारा, आदित्य रॉय कपूर, दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांसारखे अनेक सेलिब्रिटी या सोहळ्याला उपस्थित होते.

यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात ’12th Fail’, ‘जवान’, ‘सॅम बहादूर’, ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटांमध्ये चांगलीच चुरस रंगली होती. अखेर दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोणत्या चित्रपटांनी बाजी मारली? जाणून घेऊयात…

हेही वाचा : वामिका अन् अकायच्या नावांचं विराट कोहली-अनुष्का शर्माच्या नावाशी आहे खास कनेक्शन, जाणून घ्या

विजेत्यांची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे…

 • सर्वोत्कृष्ट चित्रपट : जवान
 • सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक) : (12th Fail)
 • सर्वोत्कृष्ट अभिनेता : शाहरुख खान (जवान)
 • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक): करीना कपूर (जाने जान)
 • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : राणी मुखर्जी (मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे)
 • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (समीक्षक) : ॲटली (जवान)
 • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : संदीप रेड्डी वांगा (अ‍ॅनिमल)
 • सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक) : विकी कौशल (सॅम बहादूर)
 • सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक : अनिरुद्ध रविचंदर (जवान)
 • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष) : वरुण जैन आणि सचिन जिगर (जरा हटके जरा बचके- तेरे वास्ते )
 • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (महिला) : शिल्पा राव (पठानमधील बेशरम रंग)
 • सर्वोत्कृष्ट खलनायक : बॉबी देओल (अ‍ॅनिमल)
 • सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता : आयुष्मान खुराना (ड्रीम गर्ल 2)
 • सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री: सान्या मल्होत्रा
 • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: अनिल कपूर (अ‍ॅनिमल)
 • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: डिंपल कपाडिया (पठाण)
 • मोस्ट प्रॉमिसिंग ॲक्टर: विक्रांत मेस्सी (12th Fail)
 • मोस्ट प्रॉमिसिंग अभिनेत्री: अदा शर्मा (द केरला स्टोरी)
 • अष्टपैलू अभिनेत्री: नयनतारा
 • सर्वोत्कृष्ट गीतकार: जावेद अख्तर (डंकी )
 • सर्वोत्कृष्ट लघुपट: (Good morning)
 • सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट : ओपनहायमर
 • सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर: Gnweana Shekar (IB71)
 • सर्वोत्कृष्ट टेलिव्हिजन अभिनेत्री : रूपाली गांगुली (अनुपमा)
 • सर्वोत्कृष्ट टेलिव्हिजन अभिनेता : नील भट्ट (गुम है किसी के प्यार में)
 • सर्वोत्कृष्ट टेलिव्हिजन मालिका : गुम है किसी के प्यार में
 • सर्वोत्कृष्ट वेब सीरिज: फर्जी
 • वेब सीरिज विभागातील सर्वोत्कृष्ट अभिनेता : शाहिद कपूर (फर्जी)
 • वेब सीरिज विभागातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : सुष्मिता सेन (आर्या )
 • सर्वोत्कृष्ट वेब सीरिज (समीक्षक): ‘द रेल्वे मेन’
 • वेब सीरिज विभागातील सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक): आदित्य रॉय कपूर (नाईट मॅनेजर)
 • वेब सीरिज विभागातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक): करिश्मा तन्ना (स्कूप)
 • चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट योगदान : मौसमी चॅटर्जी
 • संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट योगदान: केजे येसुदास

हेही वाचा : घरोघरी मातीच्या चुली : स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेत ‘मुलगी झाली हो’ फेम अभिनेत्रीसह झळकणार आशुतोष पत्की, पाहा प्रोमो…

दरम्यान, २०२३ मध्ये शाहरुखने ४ वर्षांच्या ब्रेकनंतर बॉलीवूडमध्ये कमबॅक केलं होतं. त्यामुळे ‘जवान’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्यावर किंग खानने आनंद व्यक्त केला आहे. ‘जवान’ने बॉक्स ऑफिसवर हजार कोटींहून अधिक कमाई केली होती.