अभिनेता आमिर खानला गेल्या दोन वर्षांमध्ये मोठ्या कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला आहे. प्रेक्षकांनी त्याच्या जुन्या वक्तव्याचा निषेध करीत त्याचा ‘लालसिंग चढ्ढा’ हा चित्रपट बॉयकॉट केला. यामुळे त्याला मोठा फटका बसला. तर त्यानंतर त्याने अभिनयातून ब्रेक घेण्याचं जाहीर केलं. त्याला आता आणखी एक धक्का बसला आहे. एका आघाडीच्या बॉलीवूड अभिनेत्याने त्याच्या चित्रपटाची ऑफर धुडकावली आहे. तरी या सगळ्यामुळे आता आमिर खान मानसिकदृष्ट्या सैरभैर झाला आहे, असं वक्तव्य एका लोकप्रिय अभिनेत्याने केलं आहे.
आमिर खान सध्या त्याच्या आगामी ‘चॅम्पियन्स’ या चित्रपटावर काम करीत आहे. या चित्रपटाची निर्मिती आमिर खान
पण या सगळ्या प्रकारावर एका लोकप्रिय अभिनेत्याने ट्वीट करत आमिर खान मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे असं म्हटलं. आमिर खानवर टीका करणारा हा अभिनेता म्हणजे कमाल आर खान. केआरकेने त्याच्या ट्वीटमध्ये लिहिलं, ” आधी आमिर खानने एका लोकप्रिय अभिनेत्याला ‘चॅम्पियन्स’मध्ये प्रमुख भूमिका साकारण्याची ऑफर दिली. मात्र त्याने ती ऑफर नाकारली. यानंतर आमिर खान आता रणबीर कपूरला या चित्रपटात काम करण्याची विनंती करत आहे. यावरून हे सिद्ध होतं की, आमिर खान मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे. कारण त्याला माहीत आहे की, रणबीर कपूर त्याचा चित्रपट का करेल?”
आता त्याचं हे ट्वीट चांगलंच व्हायरल होत आहे. या ट्वीटवर कमेंट करत नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी आमिर खानच्या बाजूने भाष्य करत केआरकेवर टीका केली, तर काहींनी केआरकेची बाजू घेत आमिरला ट्रोल केलं. तर आता आमिर खानच्या आगामी चित्रपटात प्रमुख भूमिका कोण अभिनेता साकारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.