बॉलिवूडमधल्या काही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी सध्या कोणाचे नाव घ्यायचे झाले तर अनेकांच्याच तोंडी अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोणचे नाव येते. तसं पाहायला गेलं तर प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण या देन्ही अभिनेत्रींपैकी सर्वोत्तम कोण आहे याची निवड करणं अनेकांसाठीच कठीण होऊन बसतं. पण, हॉलिवूडमध्ये नावारुपास येत असलेल्या या अभिनेत्रींपैकी एकजण दुसरीवर सरस ठरली आहे. ट्विटर इंडियातर्फे जाहीर करण्यात आलेल्या एका यादीमध्ये ट्विटरवर सर्वात जास्त प्रमाणात फॉलो करण्यात आलेल्या व्यक्तींच्या नावांचा समावेश आहे. या यादीमध्ये अभिनेत्री दिपिका पदुकोण १ कोटी ६७ लाख फॉलोअर्ससह दीपिकाने प्रियांकाला पछाडले आहे. दीपिकाच्या तुलनेत प्रियांकाच्या फॉलोअर्सचा आकडा आहे १ कोटी ५५ लाख.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाचा: दीपिकामुळे सोनमची संधी हुकली!

ट्विटर इंडियातर्फे जाहिर करण्यात आलेल्या या यादीमध्ये फक्त दोनच महिलांच्या नावांचा उल्लेख आहे. ही नावे आहेत दीपिका आणि प्रियांकाची. त्यामुळे पुढच्या वर्षी ज्यावेळी पुन्हा एकदा ही यादी जाहीर होईल त्यावेळी त्यामध्ये आणखीन महिलांच्या नावांचा समावेश असावा अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. प्रियांकाच्या तुलनेत दीपिका सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. त्यासोबतच ती या माध्यमातून अनेकदा तिच्या चाहत्यांशी संवादही साधते. त्यामुळे चाहत्यांसोबत चांगले नाते बनविण्यासाठी दिपिकाने सोशल मीडियाचा चांगलाच वापर केल्याचे म्हणाले लागेल. प्रियांकासुद्धा गेल्या काही दिवसांपासून तिच्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंवर बऱ्यापैकी सक्रिय असल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान, या दोन्ही अभिनेत्री सध्या त्यांच्या विविध प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र आहेत. प्रियांका चोप्रा लवकरच ‘बेवॉच’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या ही ‘देसी गर्ल’ अमेरिकन टेलिव्हिजन शो ‘क्वांटिको २’ मध्ये व्यग्र आहे. तर दीपिकासुद्धा तिच्या हॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज् झाली आहे. ‘xXx: रिर्टन ऑफ झेंडर केज’ या चित्रपटतून प्रस्दिध अभिनेता विन डिझेलसोबत दीपिका झळकणार आहे. याशिवाय सध्या दीपिका संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटामध्ये दीपिकाच्या सौंदर्याचा राजेशाही थाट पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

प्रियांकाचं म्हणाल तर, पुढच्या वर्षी २६ मे २०१७ ला तिचा ‘बेवॉच’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रियांका चोप्रा ‘बेवॉच’ या चित्रपटातून हॉलिवूड चित्रपटात पहिल्यांदाच काम करताना दिसणार आहे. ड्वेन जॉन्सन महणजेच ‘द रॉक’, झॅक एफ्रॉन, अलेक्झांड्रा डॅडारिओ, जॉन बॉस हे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात प्रियांका खलनायिकेची भूमिका साकारत असून तिचे हॅलोविन स्वरुपातील पोस्टर यापूर्वी ट्विटरच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यामुळे तिच्या भूमिकेबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukone beats priyanka chopra to be the most followed indian actress on social networking site twitter