निर्माता- दिग्दर्शक करण जोहर नुकताच जुळ्या बाळांचा बाबा झाला. त्याने आपल्या मुलांचे नाव यश आणि रूही असे ठेवले. करण त्याच्या सोशल मीडियावरुन मुलांशी निगडीत अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. सुरुवातीला त्याने मुलांच्या रूमचे फोटो शेअर केले होते. आता त्याने मुलांच्या ब्लँकेटचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये यश आणि रूही यांचे पाळणे आणि ब्लँकेटवर खास प्रिन्ट केलेले त्यांचे नाव स्पष्ट दिसते. व्हिडिओमध्ये जेव्हा कॅमेरा एका पाळण्यापासून दुसऱ्या पाळण्यावर जात असतो तेव्हा जमिनीवर चिकटवलेले डिस्नेचे मिकी माउसही दिसते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१० सेकंदाच्या या व्हिडिओला करणने ‘डिस्ने बॉय आमच्याकडे बघत आहे,’ असे कॅप्शन दिले आहे. अजूनपर्यंत त्याने त्याच्या बाळांचे फोटो दाखवले नसले, तरी त्याने मुलांच्या रूमचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. करणच्या मुलांचा जन्म ७ फेब्रुवारीला झाला होता. करणने त्याच्या मुलांची बातमी ट्विटरवरुनच सर्वांना सांगितली होती. मुलांचा प्रि-मॅच्युअर  जन्म झाल्यामुळे त्यांचे वजन फार कमी होते. त्यामुळे करण आणि त्याचे कुटुंब चिंतेत होते. पण पाच दिवस ‘एनआयसीयू’मध्ये ठेवल्यानंतर त्यांना घरी पाठवले.

https://twitter.com/karanjohar/status/848823644721602560

करणच्या मुलांची ही रूम शाहरुखची पत्नी गौरी खानने खास डिझाइन केली आहे. करणने गौरीसोबतचा मुलांच्या रूममधले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. गौरीही करणच्या मुलांना भेटण्यासाठी खास त्याच्या घरी गेली होती. गौरीशिवाय बॉलिवूडमधील इतर कलाकार मंडळींनीही करणच्या मुलांना बघण्यासाठी एकच रांग लावली होती. गौरीने करणच्या मुलांची रूम सजवण्याआधी रणबीर कपूरचे घरही डिझाइन केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karan johar shares video of yash and ruhi nursery on social media