छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘ये हैं मोहब्बते’ मधील रमण भल्ला अर्थात करण पटेल याने आपल्या भूमिकेमुळे प्रत्येक चाहत्याच्या मनात स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. या मालिकेमुळे करणच्या लोकप्रियतेत वाढ झाली असून त्याच्या आयुष्यात घडणा-या प्रत्येक गोष्टीकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष असते. ही गोष्ट लक्षात घेऊनच करणने आपल्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करण आणि त्याची पत्नी अंकिता भार्गव या दोघांच्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. ही आनंदाची बातमी अंकिताने करणला एका खास अंदाजात दिली. तसेच करण आणि अंकिताने आपला नवा फोटोही शेअर केला आहे.  आपला आनंद चाहत्यांबरोबर शेअर करण्यासाठी करणने ही गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली.

करण-अंकिता

‘अंकिता आता केवळ माझी पत्नी नाही तर ती कोणाची तरी आई होणार आहे. अंकिता आणि मला सख्खे भाऊ-बहिण नाहीत. त्यामुळे आम्हाला दोन बाळं हवी आहेत. आमच्या बाळाला बहीण-भावाचं प्रेम मिळावं ही आमची इच्छा आहे’, असे करणने सांगितले. तसेच करणला एका मुलीचा पिता व्हायची इच्छा असल्याचेही त्याने यावेळी सांगितले.

‘मला समजलेली गोड बातमी करणला सांगण्यासाठी मी फार उत्सुक होते. मात्र त्याच्याकडे व्यक्त होण्याचा मार्ग मला सापडत नव्हता. एका वेगळ्या पद्धतीने ही बातमी करणला समजावी यासाठी मी इंटरनेटचाही पर्याय निवडला. मात्र अपेक्षेप्रमाणे तसे झाले नाही. अखेर मी स्वत:च शुटींगच्या सेटवर जात करणच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये गेले आणि केवळ हसले. मात्र यानंतर मला करणला काही सांगण्याची गरजच भासली नाही. त्याने माझ्या नजरेतून सारं काही ओळखलं होतं’, असे अंकिताने एका मुलाखतीमध्ये सांगितलं.

लहान पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीमध्ये करणच्या नावाचा समावेश करण्यात येतो. करण आपल्या अभिनयाबरोबरच सोशल मिडीयावरील अॅक्टीव्हिटीजमध्येही सक्रिय असल्याचे दिसून येते. मात्र सध्या करणच्या आयुष्यात येणार या नव्या बातमीमुळे त्याच्या चाहत्यांबरोबरच त्याच्या मालिकेतील कलाकारांनाही विशेष आनंद झाल्याचे दिसून येत आहे.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karan patel and ankita bhargava to be a parent of new born baby soon its confirmed