इतर सेलिब्रिटींच्या तुलनेत अभिनेत्री कतरिना कैफने सोशल मीडियावर थोडं उशिराच पदार्पण केलं. मात्र, आता ती इन्स्टाग्रामवर बऱ्यापैकी सक्रीय आहे. अप्रतिम सेल्फी, लक्षवेधी पोस्ट आणि सेटवरील व्हिडिओ अपलोड करत कतरिना चाहत्यांशी जोडून राहण्याचा प्रयत्न करत असते. इन्स्टाग्रामवर नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर केला असून सध्या सोशल मीडियावर त्याचीच चर्चा सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बन जा तू मेरी रानी’ हे गाणं मोठ्या आवाजात ऐकून कतरिना वैतागल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. हे गाणं दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी लावलं असून कॅटला ते गाण्यासंही सांगत आहेत. ‘हे गाणं गाण्यासाठी ते मला आग्रह करत आहेत, पण मी वैतागले आहे,’ असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलं आहे. हा व्हिडिओ कॅटने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट केला आहे.

वाचा : मुलासमोर धुम्रपान करणाऱ्या अजयला नेटकरी धारेवर धरतात तेव्हा..

‘मेरे ब्रदर की दुल्हन’ आणि ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटांसाठी कतरिनाने दिग्दर्शक अली अब्बास जफरसोबत काम केलं आहे. यादरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्रीही जमली. कतरिनाच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, ती आमिर खानच्या आगामी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटात झळकणार आहे. त्याचसोबत शाहरुख खानच्या ‘झिरो’ या चित्रपटातही ती भूमिका साकारणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Katrina kaif annoying with vidya balan song ban ja tu meri rani watch video