गेल्या ९५ वर्षांपासून वाराणसीमध्ये आयोजित करण्यात येणारा संकट मोचन संगीत समारंभ आजपासून (बुधवार) सुरू होत आहे. सहा दिवसांच्या या संगीत महाकुंभात अनेक दिग्गज सहभागी होत आपल्या कलेचं सादरीकरण करणार आहेत. यंदा अभिनेत्री माधुरी दीक्षितसुद्धा समारंभात कथ्थक नृत्याचं सादरीकरण करणार असल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र, हे वृत्त खोटं असल्याची माहिती स्वत: माधुरीनं दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंधरा दिवसांपूर्वीच माधुरीने समारंभात नृत्य सादर करण्यासाठी तयार असल्याचं कळवलं होतं, अशी माहिती संकट मोचन मंदिराचे महंत विश्वंभरनाथ मिश्रा यांनी दिली होती. त्याचप्रमाणे ८ एप्रिल रोजी तिचा परफॉर्मन्स असून तिच्या शूटिंगच्या वेळापत्रकानुसार तारखेत बदलही होऊ शकतो असंही त्यांनी म्हटलं होतं. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्ताचा फोटो पोस्ट करत माधुरीने या संगीत समारंभात नृत्य सादर करत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून हे वृत्त खोटं असल्याचं तिनं म्हटलं आहे.

https://twitter.com/MadhuriDixit/status/981427497379262464

PHOTO: अनिल कपूरचा मुलगा ‘या’ स्टारकिडला करतोय डेट?

यंदाच्या संकट मोचन समारंभात २३ पद्म पुरस्कारप्राप्त कलाकारांचं विशेष सादरीकरण असणार आहे. त्याचप्रमाणे पंडीत जसराज, पंडीत हरिप्रसाद चौरसिया, पंडीच बिरजू महाराज, उस्ताद फजल कुरेशी, निलाद्री कुमार, शिवमणी यांसारख्या दिग्गजांचंही सादरीकरण प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhuri dixit denies the news of performing in sankat mochan festival