मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री-गायिका प्रियांका बर्वे हिच्या घरी काही दिवसांपूर्वीच एका चिमुकल्या बाळाचं आगमन झालं आहे. प्रियांकाने २० ऑगस्ट २०२० रोजी एक गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रियांकाने ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रियांकाने इन्स्टाग्रामवर पती सारंग कुलकर्णी आणि तिच्या बाळासोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये आम्ही आई-बाबा झालो असं सांगत तिने बाळाचं नाव युवान असं ठेवलं आहे, असंही सांगितलं.

दरम्यान, प्रियांका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असून यापूर्वी तिने इन्स्टाग्रामवर तिच्या बेबीबंपसोबतचे अनेक फोटो शेअर केले होते. त्यानंतर तिने पहिल्यांदाच बाळाचा फोटो शेअर केला आहे. प्रियांका मराठी कलाविश्वातील नावाजेली अभिनेत्री आणि गायिका असून तिने ‘आनंदी गोपाळ’, ‘डबल सीट’, ‘रमा माधव’ या चित्रपटांसाठी पाश्वगायन केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress priyanka barve blessed baby boy ssj