राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट तरुणांना क्रीडाक्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन देणारा आहे. तसेच, या चित्रपटाची निर्मिती नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएफडीसी)च्या सहकार्याने झाली आहे. या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन अधिकाधिक लोकांनी हा चित्रपट पाहावा, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने हा चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘फ्लाईंग सिख’ ही बिरूदावली मिळवणाऱ्या मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर आधारित ‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट करमुक्त करण्याची विनंती दिग्दर्शक ओमप्रकाश मेहरा आणि अभिनेता फरहान अख्तर यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली होती. या दोघांनी विधानभवनात थोरात यांची भेट घेऊन त्यांना निवेदनही दिले होते. या चित्रपटाचे महत्त्व लक्षात घेऊ न ‘महाराष्ट्र करमणूक कर १९२३’ नुसार चित्रपटाला करमुक्ती देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी जाहीर के ले आहे. पुढील सहा महिन्यांसाठी ही करमुक्ती वैध राहील, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले आहे.
फरहान अख्तर याने मिल्खा सिंगची प्रमुख भूमिका केली असून १२ जुलैला हा चित्रपट देशभर प्रदर्शित करण्यात आला. समीक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत ५७ कोटी रुपयांची कमाईसुद्धा केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Milkha 100 tax free in maharashtra