गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे चर्चेत आहे. आता ती प्रेग्नंट असल्याचे म्हटले जात होते. पण स्वत: पूनमने यावर वक्तव्य करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. या सर्व अफवा असल्याचे पूनमने म्हटले आहे.
पूनमने नुकताच ‘झूम’ला मुलाखती दिली. या मुलाखतीमध्ये तिला सध्या सोशल मीडियावर सुरु असलेल्या चर्चांविषयी विचारण्यात आले. तेव्हा ती म्हणाली, ‘माझ्या आयुष्याविषयी सर्वांना माहिती आहे. त्यामुळे जर मी प्रेग्नंट असते तर त्याबाबत नक्की माहिती दिली असती. आई होणे सर्वच महिलांसाठी आनंदाची बातमी असते. पण मी प्रेग्नंट नाही. अशा अफवा पसवरण्यापेक्षा एकदा लोकांनी मला विचारायचे होते.’
आणखी वाचा : ‘हा ड्रामा आता बंद करा, रिअॅलिटी शोला डेली सोप बनवलं’, नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
जुलै २०२०मध्ये पूनम पांडेने सॅम बॉम्बेसोबत साखरपूडा केला होता. त्यानंतर त्यांनी सप्टेंबर महिन्यात लग्न केले. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये सॅम आणि पूनमने वांद्रे येथे लग्न केले. लग्न केल्याची माहिती पूनमने सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली होती.
पूनम आणि सॅम हनिमूनसाठी गोव्याला गेले होते. दरम्यान त्यांच्यामध्ये वाद झाला होता. पूनमने पती विरोधात गोवा पोलिसात तक्रार दाखल केली होती. पतीने मारहाण केल्याचा आरोप पूनमने केला होता. त्यानंतर सॅमला अटक झाली होती. पण काही दिवसातच त्यांच्यामधील वाट मिटला होता. आता पूनम प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.