‘रामलीला’, ‘सिम्बा’, ‘गली बॉय’ या सारख्या चित्रपटांमुळे बॉक्स ऑफिस दणाणून सोडणारा अभिनेता म्हणजे रणवीर सिंग. यशराज बॅनरच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने करिअरची सुरुवात केली. अभिनयासोबतच रणवीर त्याच्या वेगवेगळ्या फॅशन सेन्ससाठी ओळखला जातो. हटके आणि नव्या स्टाइल कॅरी करणं रणवीरला विशेष आवडतं. त्यामुळे पुरस्कार सोहळा असो किंवा अन्य कोणतंही ठिकाण, रणवीर त्याच्या अतरंगी स्टाइलमध्ये दिसून येतो. विशेष म्हणजे त्याच्या स्टाइलचे अनेक जण चाहते असून ते रणवीरला फॉलो करताना दिसतात. मात्र युवकांमध्ये स्टाइल आयकॉन असलेला हा अभिनेता कॉलेज जीवनात प्रचंड वेगळ्या लूकमध्ये वावरत असे. याचं नुकताच एक पुरावा रणवीरने दिला आहे. त्याच्या एका चाहत्याने इन्स्टाग्रामवर त्याच्या कॉलेज जीवनातील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तो प्रचंड वेगळ्या लूकमध्ये दिसून येत आहे.
या चाहत्याने शेअर केलेला फोटो रणवीरच्या कॉलेज जीवनातील असून यामध्ये त्याच्यासोबत त्याची मैत्रीण पिया त्रिवेदी दिसून येत आहे. विशेष म्हणजे या फोटोत रणवीरने क्लीन शेव केली असून त्याचे केस खांद्यापर्यंत वाढले आहेत. त्यामुळे सध्या चाहत्यांमध्ये रणवीरच्या या लूकची चर्चा रंगली आहे.
PRICELESS #Throwback !!!
My Fanboy moment with the One & Only @akshaykumar !#9DaysToRustom
(Watch this space!) pic.twitter.com/qCc55IhT14— Ranveer Singh (@RanveerOfficial) August 3, 2016