‘आयर्नमॅन’ हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय सुपरहिरोंपैकी एक म्हणून ओळखला जातो. अभिनेता रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर याने आपल्या अफलातून अभिनयाच्या जोरावर आयर्नमॅनला लोकप्रियतेच्या शिखरावर नेले होते. मात्र अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ या सुपरहिरोपटात मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सने अर्यनमॅनचा शेवट केला. त्यामुळे आयर्नमॅनचे चाहते नाराज होते. त्यांनी सोशल मीडियाव्दारे आपली नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. या नाराज चाहत्यांना खुश करण्यासाठी मार्व्हलने पुन्हा एकदा आयर्नमॅनला रुपेरी पडद्यावर उतरवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सिनेमाब्लेंड या वेबसाईटवर देण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मार्व्हलच्या आगामी ‘व्हॉट ईफ…?’ या मालिकेत सुपरहिरो आयर्नमॅन पुन्हा एकदा अ‍ॅक्शनसीन करताना दिसेल. डिस्ने प्लस या वाहिनीवर लवकरच सुरु होणारी ही एक अ‍ॅनिमेटेड मालिका आहे. या मालिकेचे दिग्दर्शन ब्रायन अँड्र्यू यांनी केले असुन पटकथा ए. सी. ब्रॅडली यांनी लिहिली आहे.

तीन वर्षांपूर्वी या मालिकेच्या चित्रीकरणास सुरुवात झाली होती. त्यावेळी आयर्नमॅन ही व्यक्तीरेखा या मालिकेच्या पटकथेत नव्हती. परंतु चाहत्यांची नाराजी दूर करण्यासाठी आयर्नमॅन ही व्यक्तीरेखा वाढवण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला. अर्थात या सुपरहिरोला कोण आवाज देणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. परंतु आरडीजेनेच आयर्नमॅनला आवाज द्यावा अशी चाहत्यांची इच्छा आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robert downey jr is reportedly returning as iron man for disney plus mppg