बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिचे लाखो चाहते आहेत. ती सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांशी संवाद साधताना दिसते. पण सारा सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. या चर्चा एका कार्यक्रमात तिला विचारण्यात आलेल्या प्रश्नामुळे सुरु झाल्या होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपूर्वी साराने एका चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमामध्ये साराने तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफविषयीही अनेक गोष्टींचा खुलासा केला. याचदरम्यान रॅपिड फायरमध्ये वन नाइट स्टॅण्डबाबत तिचं मत विचारलं. यावर सारानेदेखील क्षणाचा विलंब न करता उत्तर दिले होते.

आणखी वाचा : ‘माझी विकेट फक्त…’, सायलीच्या फोटोवर कमेंट केल्यानंतर CSKच्या ऋतुराजची पोस्ट चर्चेत

‘वन नाईट स्टॅण्डबाबत तुझा विचार काय आहे?’ असा प्रश्न साराला विचारण्यात आला होता. त्यावर ‘मी असं अजिबात करु शकत नाही. पण मला अनेकांनी डेटसाठी विचारलं होतं. मी त्यांना हो बोलायचे. पण प्रत्यक्षात मात्र मी कधीच कोणासोबत डेवर गेले नाही’, असे उत्तर साराने दिले होते.

सारा ही अभिनेत्री अमृता सिंग आणि सैफ अली खानची मुलगी आहे. अमृता सिंगसोबत विभक्त झाल्यानंतर सैफ अली खानने करीना कपूरसोबत दुसरा संसार थाटला. परंतु आजही सारा आणि इब्राहिम ही दोन्ही मुलं सैफसोबत वेळ घालवताना दिसतात. विशेष म्हणजे करीना या दोघांचीही सावत्र आई असून देखील त्यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण नातं आहे. सारा आणि करीना या दोघींची चांगली मैत्री असून त्यांच्यातलं बॉण्डींग अनेक वेळा पाहायला मिळतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sara ali khan thoughts one night stand avb