बॉलिवूड गायक मिका सिंगच्या घरी चोरी झाल्याचं नुकतंच उघड झालं असून याप्रकरणी मिकाने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मिकाच्या घरातून ३ लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला असून त्यात दोन लाखांचे दागिने आहेत. याप्रकरणी  पोलिसांनी शोध सुरु केला आहे, अशी माहिती समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूत्रांच्या माहितीनुसार, २९ जुलै रोजी ही घटना घडली असून मिकाच्या घरी असलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने चोराचा शोध सुरु झाला आहे. २९ जुलै रोजी एका व्यक्तीने मिकाच्या घरात प्रवेश केल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसून आलं आहे. विशेष म्हणजे ही व्यक्ती मिकाच्या जवळची असल्याचं सांगण्यात येत आहे.

मिका राहत असलेल्या अॅन्क्लेव बिल्डींगमधील सीसीटीव्ही तपासण्यात काम सध्या सुरु असून याप्रकरणी अंकित वसन या व्यक्तीवर संशय व्यक्त केला जात आहे. अंकित वसन हा दिल्लीचा रहिवासी असून तो मिकाबरोबर गेल्या १४ वर्षापासून प्रोजेक्टस् आणि लाईव्ह शो करत आहे.

दरम्यान, ही घटना घडल्यापासून अंकित बेपत्ता झाला आहे. त्यामुळे त्यानेच चोरी केल्याच सांगण्यात येत आहे.  बॉलिवूडमध्ये सुपरहिट गाणी देणारा गायक मिका सिंग सध्या ‘युथ आयकॉन’ म्हणून ओळखला जातो.  पॉपगायक असलेला मिका रॅपर या प्रकारातील गाणी गाण्यात पटाईत असल्याचं दिसून येत. मिकाने आतापर्यत अभिनेता सलमान खानच्या अनेक चित्रपटांना आपला आवाज दिला आहे.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Singer mika singh has lodged complaint of theft worth rupees 3 lakh