सोना मोहपात्रा व अनु मलिक यांच्यातील वाद आता पुन्हा एकदा चर्चेत आहे. सोनाने अनु मलिकवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. या अरोपांमुळे त्याला इंडियन आयडॉलच्या ११व्या पर्वातुन बाहेरचा रस्ता देखील दाखवण्यात आला. त्यानंतर आता पुन्हा एकदा तिने त्याच्याविरोधात सोशल मीडियाव्दारे आरोप केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोना मोहापात्राने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने अनु मलिकने तिची मुस्टकदाबी करण्याचा प्रयत्न केला होता असे म्हटले आहे. “मी अनु मलिक विरुद्ध सातत्याने आवाज उठवत आहे. त्यामुळे मला रोखण्यासाठी त्याने म्युझिक डिरेक्टर्स अँड कंपोझर असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेच्या मदतीने माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु मी त्याच्या दबावाला बळी पडले नाही.” असे सोना या पोस्टमध्ये म्हणाली. सोनाची ही पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासात शेकडो नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सोना गेल्या वर्षभरापूसन सातत्याने अनु मलिकविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप करत आहे. तिने शेअर केलेल्या या पोस्टवर अनु मलिकने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र याआधी केलेल्या पोस्टवर त्याने “मी कधीही न केलेल्या गुन्हांची शिक्षा भोगत आहे. खोटे आणि निराधार आरोप माझ्यावर केले जात आहेत. परंतु मला आशा आहे, लवकरच सत्य बाहेर येईल.” अशी पोस्ट शेअर करुन प्रत्युत्तर दिले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sona mohapatra anu malik me too movement mppg