अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ‘अप्सरा’ अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लवकरच लग्नगाठ बांधणार असल्याची जोरदार चर्चा आहे. ज्या व्यक्तीसोबत सोनाली आयुष्यभराचे नाते जोडणार आहे, त्या व्यक्तीचा उल्लेख करत तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. कुणाल बेनोडेकर असं त्याचं नाव असून याच वर्षी हे दोघं विवाहबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माझ्या पार्टनरसोबत एका नव्या प्रवासाला सुरुवात करतेय.. चढ-उतार आणि साहसासाठी सज्ज आहे, असं सोनालीने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. सोनालीने उल्लेख केलेला हा पार्टनर कुणाल बेनोडेकर आहे. ती सध्या परदेशात असून सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तिने पोस्ट केलेला व्हिडीओ अॅडवेंचर स्पोर्ट्सचा असून त्यामध्ये तिने कुणालला टॅग केले आहे.

आणखी वाचा : बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर करुन मानसी नाईकने दिली प्रेमाची कबुली

‘हिरकणी’, ‘धुरळा’, ‘विकी वेलिंगकर’ असे एकापाठोपाठ एक सोनालीचे चित्रपट प्रदर्शित झाले. या चित्रपटांमधील तिच्या अभिनयाचंही प्रेक्षक-समीक्षकांकडून कौतुक झालं. सोनालीने याआधीही तिच्या रिलेशनशिपबद्दल माहिती दिली होती. आता तिच्या लग्नाच्या तारखेची घोषणा कधी होणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonalee kulkarni wedding this year she is in relationship with kunal benodekar ssv