अभिनयानंतर दिग्दर्शन क्षेत्रात नशीब आजमावणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतचा ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. ‘मणिकर्णिका’ हा कंगनाचा पहिलाच चित्रपट. मात्र या पहिल्याच प्रयत्नात कंगनाने स्वत:ला सिद्ध करुन दाखवलं. ‘मणिकर्णिका’ प्रदर्शित होण्यापूर्वी त्याला अनेक वादांना सामोरं जावं लागलं होतं. अनेक संस्थांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली होती. मात्र या वादावर मात करुन अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर आता या चित्रपटातील अभिनेता सोनू सूदचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या चित्रपटात सोनू वीर सदाशिवची भूमिका साकारणार होता. त्यासाठी त्याने तयारीही केली होती. त्याची ही मेहनत व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये सोनू जबरदस्त लूकमध्ये दिसत असून त्याची पिळदार शरीरयष्टी पाहुन अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. दरम्यान, सोनूने चित्रपटातून काढता पाय घेतल्यानंतर ही भूमिका जीशान अयूबच्या वाट्याला आली.

या चित्रपटामध्ये कंगना राणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेत असून अंकिताने झलकारी बाईंची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये या दोघींव्यतिरिक्त अभिनेता सोनू सूददेखील झळकणार होता. त्याने या चित्रपटातील काही भागांचं चित्रीकरणही पूर्ण केलं होतं. मात्र काही कारणास्तव त्याने या चित्रपटातून काढता पाय घेतला होता.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonu sood look from manikarnika