लग्न म्हणजे जन्मभराचे ऋणानुबंध… प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा क्षण. आपल्या कुटुंबाला मागे सोडून नवर्‍याच्या घरी मुलगी जाते ती फक्त आपल्या जोडीदारावर असलेल्या विश्वास आणि प्रेमाखातर. सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेमध्ये अनु तिच्या भूतकाळातील सगळ्या आठवणी, अवीबरोबरचे नाते मागे ठेऊन सिद्धार्थच्या प्रेमाखातर लग्नासाठी होकार देते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मालिकेमध्ये या दोघांच्या आयुष्यात आता सुखाच्या सरी येणार हे नक्की! लग्नात सगळ्या विधी पार पडल्या जाणार आहेत. सप्तपदी, मंगलाष्टक, सुनमुख, नऊवारी साडी, चंद्रकोर, हिरवा चुडा, मंगळसूत्र या लूकमध्ये अनु खूप सुंदर दिसत आहे. इतक्या दिवसांनंतर या दोघांच्या आयुष्यात आलेला आनंद सान्वी दुर्गाच्या मदतीने भंग करण्याचा प्रयत्न करणार नाही हे अशक्यच.

आणखी वाचा : अवघ्या पाच वर्षांत मोडला दिया मिर्झाचा संसार, घटस्फोटानंतरही ठेवणार मैत्रीचे नाते 

सगळे सुरळीत सुरू असताना यामध्ये सान्वी आणि दुर्गा मिठाचा खडा टाकणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. लग्नाच्या दिवशीच सिद्धार्थ आणि दुर्गाच्या गाडीचा अपघात होणार आहे. पण, यामध्ये दोघांनाही कुठल्याही प्रकारची दुखापत होणार नसून ते सुखरूप लग्न मंडपात पोहोचणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sukhachya sarini he man baware anu and siddharth wedding watch photos ssv