प्रेमात योग्य किंवा अयोग्य असं काही नसतं. प्रेमामध्ये सारं काही माफदेखील असतं. प्रेम जर खरं असेल तर माग त्या प्रेमासाठी व्यक्ती कोणत्याही आव्हानाला किंवा परिक्षेला समोरा जाण्यासाठी तयार असतो. त्यासोबतच आपल्या आवडता व्यक्तीसाठी आपण कोणत्याही गोष्टीचा त्याग करण्यास तयार असतो. तसंच काहीसं सध्या ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेमध्ये पाहायला मिळत आहे. सिद्धार्थचं अनुवर प्रचंड प्रेम आहे, तिच्यासाठी तो साऱ्या सुखाचा त्यागदेखील करण्यास तयार आहे. मात्र तिच्यासमोर प्रेमाची कबुली द्यायला तो घाबरतोय. त्यामुळे त्याच्या प्रेमाच्या वाटेवर तो अनुला मागणी घालणार की नाही याकडे साऱ्याचं लक्ष लागलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिद्धार्थ आणि अनुच्या नात्याच्या अनेक छटा आहेत. सिद्धार्थच्या नकळत अनुबरोबरच्या मैत्रीचं रुपांतर आता हळूहळू प्रेमात व्हायला लागलं आहे. मात्र या दोघांच्या नात्यामध्ये दुर्गा अडसर ठरत आहे. दुर्गाला अनु आवडत नसल्यामुळे ती अनुला सिद्धार्थच्या मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी तिने बरीच कट कारस्थानंदेखील केली. मात्र या साऱ्याचा अनु आणि सिद्धार्थच्या मैत्रीवर कोणताही परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे सानवीनेदेखील अनुला सिद्धार्थपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. पण कुठेतरी अनुचा चांगुलपणा, साधेपणा सिध्दार्थला पटला आणि तो तिच्या प्रेमात पडला.

आता सिध्दार्थच्या प्रेमाची खरी कसोटी लागणार आहे. कारण, तो अनुला त्याच्या प्रेमाची कबुली देणार आहे. याची कल्पना दुर्गाला आधीपासूनच आहे आणि म्हणूनच दुर्गा सिध्दार्थला बजावून सांगते कि, अस केलसं तर तुला घर, संपत्ती सगळ सोडून जाव लागेल. सिध्दार्थ प्रेमासाठी अनपेक्षित निर्णय घेतो आणि घर, संपत्ती, व्यवसाय सोडून देतो.

खऱ्या अर्थाने आता सिध्दार्थच्या प्रेमाची परीक्षा सुरु झाली आहे. सिद्धार्थ अनुला मागणी घालू शकेल का ? सिद्धार्थसमोर कुठली आव्हानं येतील ? तो त्यांना कसा सामोरा जाईल ? हे बघणे रंजक असणार आहे. तेव्हा नक्की बघा सुखाच्या सरींनी हे मन बावरे सोम ते शनि रात्री ९.०० वा. कलर्स मराठीवर.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sukhachya sarinni he maan bavare siddhartha love confession ssj