अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या बेधडक भूमिकांसोबतच सडेतोड वक्तव्यांसाठीही प्रसिद्ध आहे. ‘पिंक’, ‘बेबी’, ‘नाम शबाना’ या चित्रपटांमध्ये तिने ज्याप्रकारे धाडसी भूमिका साकारल्या. त्याचप्रकारे खऱ्या आयुष्यातही आपण हजरजबाबी, साहसी असल्याचं तापसीने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) तापसीने एका पत्रकाराने हिंदी भाषेत बोलायला सांगितले. तेव्हा तापसीने दिलेलं उत्तर ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘इफ्फी’त कलाकारांच्या चर्चासत्रादरम्यान एका पत्रकाराने तापसीला हिंदीत बोलण्याची विनंती केली. हे ऐकून तापसीने थेट उपस्थितांना प्रश्न विचारला की, “इथे हजर असलेल्या सर्वांना हिंदी भाषा कळते का?” तिच्या या प्रश्नावर श्रोत्यांनी नकारार्थी उत्तर दिलं. त्यावर पत्रकाराने पुन्हा तिला म्हटलं, “तू हिंदी चित्रपटांत काम करतेस तर हिंदी बोलायला पाहिजे.” यावर क्षणाचाही विलंब न करता तापसीने धडधडीत उत्तर दिलं, “मी दाक्षिणात्य अभिनेत्रीसुद्धा आहे तर तेलुगू आणि तामिळ भाषेतही बोलू का?” यावर सभागृहात एकच हशा पिकला.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचं महत्त्व

या चर्चासत्रात तापसीने दाक्षिणात्य चित्रपटांचं महत्त्व तिच्या आयुष्यात कितपत आहे याविषयी सांगितलं. “दाक्षिणात्य चित्रपटांतून बॉलिवूडमध्ये येऊन क्वचितच कलाकार यशस्वी ठरतात आणि मला माझी सध्याची जागा सोडायची नाही. त्याचबरोबर मी दाक्षिणात्य चित्रपटांत काम करणं सोडणार नाही. ती इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय मूर्खपणाचा ठरेल. भविष्यात मी तिथे काम करत राहीन. तिथून मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यामुळे त्यांच्याप्रती माझ्या मनात कृतज्ञतेची भावना आहे. मी दाक्षिणात्य इंडस्ट्रीचा वापर बॉलिवूडमध्ये येण्यासाठी कधीच नाही केला. त्यांनी मला खऱ्या अर्थाने लाइट, कॅमेरा काय असतं हे शिकवलं.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taapsee pannu gives a befitting reply to a man who asked her to talk in hindi ssv