‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटानंतर तेलुगूसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही प्रकाशझोतात आलेला अभिनेता विजय देवरकोंडाने नवीन घर घेतलं. हैदराबादमधील ज्युबिली हिल्स इथं त्याने हे घर घेतलं असून फेसबुक अकाऊंटवर गृहप्रवेशाचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या घराची किंमत जवळपास १५ कोटी रुपये इतकी आहे. फेसबुकवर फोटो पोस्ट करत विजयने लिहिलं, ‘माझं नवीन घर इतकं मोठं आहे की मला आता भीती वाटू लागली आहे. या नवीन घरात राहण्यासाठी आईलाही बोलावलं आहे.’ या फोटोमध्ये विजयसोबत आई-वडील व त्याचा भाऊसुद्धा आहे.

विजयचा भाऊ आनंद याने नुकतंच चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. ‘दोरसानी’ असं त्याच्या पहिल्या चित्रपटाचं नाव आहे. गृहप्रवेशाला विजय व आनंदचे मित्र, कुटुंबीय उपस्थित होते.

विजयच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, तो लवकरच ‘वर्ल्ड फेमस लव्हर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन क्रांती माधव यांनी केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay deverakonda moves into a plush house worth this much crore in jubilee hills see pics ssv