मुंबई : विस्कळीत वेळापत्रक आणि विविध कारणांमुळे नागरिकांना लोकलमधून प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तांत्रिक कारणास्तव ३० ऑगस्ट रोजी मध्य रेल्वे मार्गावरील काही ‘वातानुकूलित’ लोकलच्या जागी ‘विनावातानुकूलित’ लोकल चालविण्यात येणार आहेत. याबाबत कोणतीच कल्पना नसलेल्या प्रवाशांचा गोंधळ उडाला. परिणामी, अनेक प्रवाशांना गारेगार प्रवासाऐवजी सामान्य लोकलमधील गर्दीत धक्के खात प्रवास करावा लागला.

मध्य रेल्वेवरील कल्याण, सीएसएमटी, अंबरनाथ, दिवा, परळ या ठिकाणाहून सुटणाऱ्या ‘वातानुकूलित’ लोकलऐवजी ‘विनावातानुकूलित’ लोकल धावणार आहेत. लोकलमधील गर्दीत अनेक समस्यांचा सामना करीत प्रवाशांना प्रवास करावा लागतो. या अडचणीतून दिलासा मिळण्यासाठी अनेक जण वातानुकूलित लोकलमधून प्रवास करणे पसंत करतात. मात्र ‘वातानुकूलित’ लोकलऐवजी ‘विनावातानुकूलित’ लोकल चालविण्यात येणार असल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करीत होते.

हे ही वाचा… मुंबई : पालिकेच्या एकाच शाळेत दोन मुख्याध्यापकांची नियुक्ती

हे ही वाचा… Mumbai Hit and Run: मुंबईत पुन्हा ‘हिट अँड रन’; अल्पवयीन चालकाच्या वाहनानं दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

या ‘वातानुकूलित’ लोकलऐवजी ‘विनावातानुकूलित’ लोकल सेवा

कल्याण – सीएसएमटी : सकाळी ७ वाजून १६ मिनिटांनी

सीएसएमटी – कल्याण : सकाळी ८ वाजून ४९ मिनिटांनी

कल्याण – सीएसएमटी : सकाळी १० वाजून २५ मिनिटांनी

सीएसएमटी – अंबरनाथ : सकाळी ११ वाजून ५८ मिनिटांनी

अंबरनाथ – सीएसएमटी : दुपारी २ वाजता

सीएसएमटी – अंबरनाथ : सायंकाळी ४ वाजून १ मिनिटांनी

डोंबिवली – परळ : सायंकाळी ५ वाजून ३२ मिनिटांनी

परळ – कल्याण : सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी

कल्याण – परळ : रात्री ८ वाजून १० मिनिटांनी

परळ – कल्याण : रात्री ९ वाजून ३९ मिनिटांनी