राज्यात औद्योगिक आणि निवासी वीजदर चढे असल्याबाबत नाराजी असताना वीजदर कमी करण्याचा आग्रह राज्य सरकारने धरला आहे. दिल्लीत ‘आप’ने वीजदर कपातीच्या मुद्दय़ावर लोकप्रियता मिळवल्याच्या पाश्र्वभूमीवर राज्यातील वीजदरांबाबतचा लोकांचा आणि उद्योजकांचा संताप कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
औद्योगिक वीजदरांच्या कपातीबाबत सोमवारी ‘महावितरण’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. त्यात वीजदर कपातीचा आग्रह राज्य सरकारने धरल्याचे समजते. त्यावर राज्य सरकारचे अनुदान त्यासाठी अत्यावश्यक राहील, असे ऊर्जा विभागाकडून सांगण्यात आले. त्यावर वीजदर कपातीचे प्रमाण आणि त्यासाठीच्या अनुदानाच्या समीकरणांवर आणि पर्यायांवर चर्चा झाली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 01-01-2014 at 12:45 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government interested to cut electricity rates