एका २० वर्षीय विवाहित महिलेवर मुंबईत एकाच दिवसात तीन वेळा बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही महिला नेपाळहून मुंबईत नोकरीसाठी आली होती. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून एका फरारी आरोपीचा शोध सुरू आहे.
नेपाळच्या मोतीनगर येथे राहणाऱ्या या महिलेचा विवाह चार वर्षांपूर्वी झाला होता. पतीशी तिचे जमत नव्हते. तो गेल्या वर्षी मुंबईतील एका पर्सच्या कारखान्यात काम करीत होता. नंतर तो नेपाळला परत गेला. त्या कारखान्यातील अख्तर नावाच्या तरुणाशी या महिलेची ओळख होती. त्याने मुंबईत नोकरी देण्यासाठी तिला बोलावले होते. शुक्रवारी सकाळी ती पवन एक्सप्रेसहून मुंबईत आली. कारखान्याचा मालक जुल्फिखार शेख (२६) याच्याशी तिने संपर्क साधला. जुल्फिकारने तिला आपल्या मदनुपरा येथील कारखान्यात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला आग्रीपाडा येथील बेबी गार्डन येथे सोडून दिले. त्याच कारखान्यात काम करणारा फिरोज हा तिला भेटायला गेला आणि त्यानेही तिला जवळच्याच एका लॉजमध्ये नेले व तिच्यावर बलात्कार केला. या महिलेने आपल्या नातेवाईकोंशी संपर्क साधून नेपाळला परत जाण्याचा प्रयत्न केला. परंतु तिची गाडी चुकली. त्यामुळे त्या कारख्यान्यातील अन्य एक तरुण परवेझ शेख याने रात्रभर मुक्काम करण्याच्याच्या बहाण्याने तिला ए वन गेस्ट हाऊसला नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.
दरम्यान, एका नेपाळी महिलेला मुंबई आणून विकण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती एका स्वयंसेवी संस्थेने नागपाडा पोलिसांना दिली होती. पोलिसांनी शनिवारी पहाटे साडेचार वाजता या गेस्ट हाऊसवर छापा घालून तिची सुटका केली. तिच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी जुल्फिकार शेख (२५)आणि परवेझला शेख (२५) या दोघांना अटक केली असून तिसरा फरारी आरोपी फिरोज याचा शोध सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nepali woman gang raped in mumbai two held