scorecardresearch

आर्णी येथे वऱ्हाडाच्या वाहनास अपघात, १४ जखमी

ही घटना आर्णी –बोरगाव मार्गावर आज बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली

अपघाताग्रस्तांच्या मदतीसाठी अशी गर्दी झाली

यवतमाळ – विवाह समारंभाकरीता वऱ्हाडी घेऊन जात असलेल्या मालवाहू वाहनास अपघात होऊन १४ वऱ्हाडी जखमी झाले. ही घटना आर्णी –बोरगाव मार्गावर आज बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. जखमींना तात्काळ आर्णी येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले.

आर्णी येथून लग्न समारंभाकरीता तालुक्यातील भंडारी शीवर येथे जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी झाले. यात १४ जण जखमी झाले असून पाच ते सहा वऱ्हाडी गंभीर जखमी झाले.  जखमींमध्ये लहान बालकांचाही समावेश आहे. अपघात होताच मार्गावरील वाहनधारकांनी पोलिसांना माहिती देवून वैद्यकीय मदत मागवली. जखमींमध्ये सुरेश बाबर, नारायण बाबर, सुरेश तांबे, सौरभ शिंदे, मैना बालट, राधा शिंदे, बेबी राठोड, उकंडा राठोड, रोहित शेगर, सुमन शेगर, धर्माबाई तांबे, राजू शेर, प्रदीप शिंदे, दीपक सोळंके, सुनील तांबे, आरूषी सोळंके यांचा समावेश आहे. जखमींना तात्काळ आर्णी येथील रूग्णालयात हलविण्यात आले.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 14 injured in road mishap in yavatmal zws