वर्धा : अपक्ष उमेदवार सहानुभूती असल्याच जोर मारतो व रिंगणातील बड्यांना घाम सोडत असतो, हे सार्वत्रिक चित्र म्हणता येईल. तो निवडून येईल की नाही सांगता येत नाही, असे पण मतदार सांगतात. यालाच ‘एक्स फॅक्टर’ म्हटल्या जाते. विद्यमान आमदार डॉ. पंकज भोयर व आघाडीचे शेखर शेंडे या बड्या उमेदवाराच्या विरोधात उडी घेणारे पावडे यांनी आपली लढाई ही सामान्य जनतेची म्हणून भावनिक साद घालत आहे. पांढरपेशी व चाकरमानी वर्ग त्यांची चर्चा पण करतो. पण इतकी मते डॉक्टर आणणार कुठून हा प्रश्नही हाच वर्ग करतो. सामाजिक कार्याने सुपरिचित पावडे यावेळी काँग्रेसचे तिकीट आणण्यास चांगलेच धडपडले. पण काँग्रेसचे जातीय समीकरण व पक्षनिष्ठा यावर ते मात करू शकले नाही. आता चर्चेत असल्याने ते आमची मते खाणार नाही, असा दावा भोयर व शेंडे करीत असल्याने डॉक्टर एक्स फॅक्टर ठरू लागले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ते काँग्रेस विचारसरणीचे म्हणून काँग्रेस मतात छेद देतील हा भाजपचा दावा तर डॉक्टर हे उच्च घटकातील म्हणून ते भाजप मतास सुरुंग लावतील, असा काँग्रेसला विश्वास. कुणबी फॅक्टर आहेच. पावडे व भोयर हे कुणबी वर्गातील व लढतीत असलेले शेंडे हे तेली समाजाचे. मत विभाजनाचा लाभ शेंडेंना अशा दाव्यावर शेंडे नको असणारे अन्य समाजघटक पावडे यांना मिळतील, असे उत्तर येते . विशेष म्हणजे तिघेही उमेदवार व्यक्तिगत टीका टाळतात. परस्परांचे बऱ्यापैकी मैत्र आहेच. पण निवडणूक आता निकराची ठरू लागल्याने त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झालेत.

हेही वाचा…काँग्रेसचे नेते व माजी मंत्री नितीन राऊत यांच्या कारला अपघात

डॉ. पावडे प्रचार या आक्रमक राजकीय पैलूपासून दूर आहे. शेंडे यांची उमेदवारी आली आणि लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधाचा सर्वपक्षीय एकोपा यावेळी नाहीसा झाला. या भारत जोडोतील एक आप पक्ष थेट पावडे समर्थनार्थ पुढे आला. इतर काही घटक शांत आहे. तो निर्णयाक ठरणार म्हणून पावडे एक्स फॅक्टर ठरू लागले आहे. त्यामुळेच त्यांची रिंगणातील हजेरी दखलपात्र ठरते.जातीय, पक्ष की व्यक्तिमत्व वळणावर निवडणूक जाणार हा संभ्रम सध्या आहे. म्हणून लढतीस दुहेरी की तिहेरी असे असे स्पष्ट म्हटल्या जात नाही. भोयर यांना आव्हान कुणाचे, हे हाच एक्स फॅक्टर निश्चित करणार.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr sachin pavde become x factor against mla dr pankaj bhoir and shekhar shende pmd 64 sud 02