-
बॉलिवूडमध्ये अनेक तरुणींना कास्टिंग काउचचा सामना करावा लागतो. यासंदर्भात अभिनेत्री मानवी गगरुने अलीकडेच तिला आलेला एक धक्कादायक अनुभव सांगितला. ( सर्व फोटो सौजन्य – मानवी गगरु इन्स्टाग्राम)
-
वेब सीरीजमधल्या एका रोलसाठी तिच्य़ाकडे 'कॉम्प्रोमाइज' करण्याची मागणी करण्यात आली.
-
टीवीएफ ट्रिपलिंग, फोर मोअर शॉट्स प्लीज सारख्या गाजलेल्या वेब सीरीजमध्ये मानवी गगरुने काम केले आहे.
-
मागच्यावर्षी एका अज्ञात नंबरवरुन फोन आला होता असे या ३४ वर्षीय अभिनेत्रीने कोईमोई डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
-
फोन करणाऱ्याने वेब सीरीजचे जे बजेट सांगितले होते. ते समाधानकारक नव्हते असे तिने सांगितले.
-
मी कमी बजेटचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर फोन करणाऱा लगेच तिप्पट रक्कम देण्यास तयार झाला. फक्त त्याने एक अट ठेवली.
-
बजेटचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर ते खूपच कमी असल्याचे मी त्यांना सांगितले. तुम्ही बजेटबद्दल का बोलताय? तुम्ही स्क्रिप्ट सांगा, जर मला इंटरेस्ट वाटला आणि तुम्हाला मला रोल देण्यात इंटरेस्ट असेल तर पैशाबद्दल बोलू असे मानवी गगरुने त्यांना सांगितले.
-
मी बजेटवरुन माझी नाराजी सांगितल्यानंतर तो लगेच तिप्पट पैसे देण्यास तयार झाला. मी तुम्हाला इतकी रक्कमही देऊ शकतो पण तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावे लागेल असे फोन करणाऱ्याने सांगितल्याचे मानवीने कोईमोई डॉट कॉमला सांगितले.
-
#MeToo सारखी मोहीम झाल्यानंतरही इंडस्ट्रीमध्ये अशा गोष्टी कशा घडतात असे मानवी गगरु म्हणाली.
-
तिने फोन करणाऱ्या इसमाला भरपूर सुनावले. असे बोलण्याची तुमची हिम्मतच कशी झाली? मी पोलिसात तक्रार नोंदवतेय असे तिने सांगितले.
-
टीवीएफ ट्रिपलिंग, फोर मोअर शॉट्स प्लीज, मेड इन हेव्हन या वेबसीरीजमुळे मानवी गगरु हे नाव आज घराघरामध्ये ओळखले जाते.
-
'धूम मचाओ धूम' मधून मानवी गगरुने इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले.
-
'शुभ मंगल ज्यादा सावधान', ‘उजडा चमन’ या चित्रपटात तिने काम केले आहे.
-
यापूर्वी सुद्धा अभिनेत्री मानवी गगरुला अशा प्रकारचा अनुभव आला आहे. एका ऑडिशनमध्ये दिग्दर्शकाने तिला रेप सीन करुन दाखवं असं सांगितलं होतं.
-
दिग्दर्शकांनी रेप सीनविषयी सांगितल्यानंतर मी घाबरुन तिथून पळून आले असे तिने सांगितले होते.
PHOTOS: रोलसाठी ठेवली कॉम्प्रोमाइजची अट, ‘फोर मोअर शॉट्स प्लीज’च्या अभिनेत्रीचा धक्कादायक अनुभव
Web Title: Four more shots please actress maanvi gagroo reveals she was asked to compromise dmp