-
सध्याचे कलाकार सोशल मीडियावरही मोठया प्रमाणावर सक्रीय असतात. टिस्का चोप्रा अशाच कलाकारांपैकी एक आहे. ( फोटो सौजन्य – टिस्का चोप्रा इन्स्टाग्राम)
-
सध्या लॉकडाउनमुळे घरीच असलेली टिस्का चोप्रा इन्स्टाग्रामवर वेगवेगळे फोटो पोस्ट करत असून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात आहे.
-
टिस्का चोप्राला लोक अभिनेत्री म्हणून ओळखतात. पण अभिनेत्री असण्याबरोबरच ती निर्माती, लेखिकाही आहे. लेखिका म्हणून तिची बाजू फार जास्त लोकांना माहीत नाहीय.
-
सिनेसृष्टी लवकर सुरु झाली नाही तर, मी नव्या करीयरची आतापासून तयारी सुरु केली आहे. माझा पहिला ग्राहक घरामध्येच आहे. हा ग्राहकही अत्यावश्यक सेवेचा भाग आहे. त्यामुळे यावेळी पैसे आकारणार नाही. टिस्का या फोटोमध्ये तिचे पती संजय चोप्रा यांचे केस कापताना दिसत आहे.
-
वेगवेगळया भाषांच्या ४५ चित्रपटांमध्ये टिस्काने काम केले आहे.
-
आमिर खान बरोबरच्या 'तारे जमीं पर'मधील तिची भूमिका विशेष गाजली.
-
आमिर खान, प्रकाश झा, मधुर भांडारकर, अभिनय देव, नागेश कुकुनूर सारख्या दिग्गज दिग्दर्शकांबरोबर तिने काम केले आहे.
-
टिस्का चोप्रा चटनी या लघुपटात काम केले आहे. या सिनेमात एका मध्यम वर्गीय भारतीयाची कथा मांडण्यात आली आहे.
-
टिस्का आतापर्यंत तारे जमीं पर, रहस्य आणि किस्सा या सिनेमात दिसली आहे.
-
टिस्का चोप्राने दिल्ली विद्यापीठातून साहित्यामध्ये पदवी मिळवली आहे. थिएटरमध्ये मोठया प्रमाणावर काम केले आहे.
-
टिस्का चोप्रा 'अॅक्टिंग स्मार्ट' या पुस्तकाची लेखिका आहे. वाचकपसंती असलेल्या पुस्तकाचा हिंदी भाषेतही अनुवाद झाला आहे.
-
हिमाचल प्रदेश कसौलीमध्ये जन्मलेल्या टिस्का चोप्राचे वडिल मुख्याध्यापक होते. दिल्ली विद्यापीठातून तिने इंग्लिश साहित्यामध्ये पदवी घेतली.
-
कॉलेजमध्ये असताना थिएटरमध्ये काम करण्याबरोबर तिने वेगवेगळया पब्लिकेशनसाठी लिहायला सुरुवात केली.
-
टिस्काने चित्रपटांबरोबरच अनेक आघाडीच्या ब्रॅण्डसाठी जाहीरातींमध्येही काम केले आहे.
-
टिस्का चोप्राने एअर इंडियामध्ये पायलट असलेल्या कॅप्टन संजय चोप्रा यांच्याबरोबर विवाह केला. या जोडप्याला एक मुलगी असून चोप्रा कुटुंब सध्या मुंबईमध्ये राहते.
PHOTOS: नव्या करिअरची तयारी? अभिनेत्री टिस्का चोप्राची दुसरी बाजू
Web Title: Bollywood actress tisca chopra coronavirus lockdown dmp