-
सोज्वळ चेहरा आणि निखळ अभिनय म्हणजे वैदेही परशुरामी. तिचं सौंदर्य आणखी खुलवणारे सुंदर डोळे आणि उत्तम अभिनयकौशल्य यासाठी ती प्रसिद्ध आहे.
-
प्रत्येक आव्हानात्मक भूमिका वैदेहीने मोठ्या पडद्यावर अगदी सहज सोप्या पद्धतीने साकारली मग ती 'FU' मधील बिनधास्त रेवती असो किंवा 'डॉक्टर काशिनाथ घाणेकर' मधली अल्लड कांचन, 'वजीर' मधली समंजस नीना किंवा थेट 'सिम्बा' या हिंदी चित्रपटातील तिने साकारलेली आकृतीची भूमिका असो.
-
अल्पावधीतच, केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. सोशल मीडियाच्या विश्वातसुद्धा तिने निराळी प्रसिद्धी मिळवली आहे.
-
वैदेहीने 'वेड लागी जीवा' या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. मराठीसह तिने हिंदीमध्येही काम केलं आहे. अभिनेत्री असण्यासोबतच ती उत्तम नृत्यांगना आहे.
-
वैदेही सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांसोबत संवाद साधत असते. वैदेहीने नुकतंच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. वैदेहीने परिधान केलेल्या ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे. (सर्व फोटो सौजन्य : वैदेही परशुरामी / इन्स्टाग्राम)
सोज्वळ वैदेहीचे स्टायलिश लूक चर्चेत
Web Title: Marathi actress vaidehi parashurami glamorous look latest photo sdn