-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बापटची 'सिटी ऑफ ड्रिम्स' ही गाजलेली वेब सीरिज आहे.
-
राजकीय घराणं, या कुटूंबापासून दूर असलेले राजकीय वारसदार आणि त्यांच्यात सुरू असलेली राजकीय चढाओढ या भोवती फिरणाऱ्या या वेब सीरिजने अनेकांची मनं जिंकली. या सीरिजचं आता दुसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.
-
'सिटी ऑफ ड्रिम्स २'च्या सेटवरचे काही फोटो प्रिया बापटने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
पहिला सीझन हा दमदार अभिनय आणि राजकीय नाट्यामुळे प्रचंड गाजला होता. त्यानंतर प्रेक्षक हे दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते.
-
या वेब सीरीजमध्ये अभिनेत्री प्रिया बापटसोबतच सिद्धार्थ चांदेकर, अतुल कुलकर्णी, देवस दीक्षित, विकास केणी, संदीप कुलकर्णी असे अनेक दिग्गज मराठी कलाकार झळकणार आहेत.
-
मराठी कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे 'सिटी ऑफ ड्रिम'चा पहिला सीझन प्रचंड गाजला होता.
-
'सिटी ऑफ ड्रीम्स' या वेब सीरिजचे दिग्दर्शन नागेश कुकनुर यांनी केले आहे.
-
रोहित बनवलीकर आणि नागेश कुकनुर यांनी सहलेखन केले होते.
-
ही सीरिज हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रिया बापट / इन्स्टाग्राम)
City of Dreams 2: पहा पडद्यामागची ‘पौर्णिमा गायकवाड’
Web Title: Hotstar webseries city of dreams season 2 cast priya bapat behind the scenes information photos sdn