-
बॉलिवूडमधील अनेक कलाकार फॅशन गोल्स देण्याची एक संधी सोडत नाही. एखाद्या पार्टीपासून ते विमानतळापर्यंत सर्वच अभिनेते अभिनेत्री नवनवीन कपडे परिधान करत असतात. तुमच्या आवडत्या सेलिब्रिटींचे विमानतळावरील नेमके कोणते कपडे परिधान केले आहेत, ते काय फॅशन गोल्स देतात यावर एक नजर टाकूया.
-
जान्हवी कपूर – अभिनेत्री जान्हवी कपूर ही नेहमी विमानतळावर आरामदायी कपड्यांमध्ये दिसते. नुकतंच तिने विमानतळावर फ्लोरल ड्रेस परिधान केला होता.
-
कियारा अडवाणी: गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कियारा अडवाणी चांगलीच चर्चेत आहे. गेल्या आठवड्यात ती मुंबई विमानतळावर स्पॉट झाली होती. त्यावेळी तिने पांढऱ्या रंगाची पँट आणि निऑन रंगाचा क्रॉप टॉप घातला होता.
-
मीराबाई चानू: ऑलिम्पिकमधील रौप्य पदक विजेती मीराबाई चानू ही देखील विमानतळावर स्टायलिश लूकमध्ये दिसत आहे. काही दिवसांपूर्वी तिने विमानतळावर ट्रॅकसूट परिधान केला होता.
-
मृणाल ठाकूर: तुफान चित्रपटातील अभिनेत्री मृणाल ठाकूर ही नेहमी विमातळावर आरामदायी कपडे घालून वावरताना दिसते. तिने काही दिवसांपूर्वी टँक टॉप आणि काळ्या रंगाची पँट घातली होती.
-
रकुलप्रीत सिंग: अभिनेत्री रकुलप्रीत सिंग ही विमानतळावर नेहमी कॅज्युअल पण तितक्याच स्टायलिश कपडे परिधान करते. रकुलप्रीत सिंग ही नुकतंच ट्रॅकपँट आणि पांढऱ्या रंगाचा टॉप घालून स्पॉट झाली होती. त्यासोबत तिने पांढऱ्या रंगाचे स्निकर्सही घातले होते.
-
रणवीर सिंग – नेहमी नवनवीन अंदाजातील कपडे घालून चर्चेत असलेला अभिनेता म्हणून रणवीर सिंगला ओळखले जाते. मात्र नुकतंच रणवीर सिंगने विमानतळावर फॉर्मल कपडे घातले होते. निळ्या रंगाचे शर्ट त्यावर ब्लेझर असा फॉर्मल लूक त्याने परिधान केला होता.
-
सानिया मिर्झा – टेनिसपटू सानिया मिर्झा विमानतळावर नेहमी आरामदायक कपडे परिधान करत असते. नुकतंच ती लाल रंगाचा टी-शर्ट ड्रेस आणि निळ्या रंगाच्या स्निकर्स घालून विमानतळावर स्पॉट झाली होती.
-
उर्मिला मातोंडकर – अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने विमानतळावर निळ्या रंगाचा ट्रॅकसूट परिधान केला होता.
-
वाणी कपूर: अभिनेत्री वाणी कपूर ही काही दिवसांपूर्वी निळ्या रंगाची जिन्स आणि टॉप घालून विमानतळावर स्पॉट झाली होती. यामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. (सर्व फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस/ वरिंद्र चावला)
जान्हवी कपूर ते उर्मिला मातोंडकर, बॉलिवूड सेलिब्रिटींचे ‘फॅशन गोल्स’
Web Title: Bollywood celebrities janhvi kapoor urmila matondkar kiara advani many more option for comfort at airport nrp