-
काही दिवसांआधी म्हणजेच २१ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर झाला होता.
-
बारावीच्या निकालानंतर दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार? याची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये होती.
-
दहावीचे विद्यार्थी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होते, तो क्षण आता आला आहे.
-
दहावीचा निकाल कधी लागणार या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे. येत्या सोमवारी (२५ मे) हा निकाल जाहीर केला जाणार आहे.
-
राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी या संदर्भातील घोषणा परिपत्रकाद्वारे केली.
-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल, सोमवारी दुपारी एक वाजता तुम्हाला पाहता येणार आहे.
-
यावर्षी दहावीच्या परीक्षेत राज्यात १६ लाखांहून अधिक विद्यार्थी असल्याची नोंद आहे.
-
तुम्ही हा निकाल ऑनलाइन पाहू शकता. दुपारी एक वाजता तुम्ही पुढील संकेतस्थळांना भेट द्या. Maharashtra 10th SSC Result 2024 Website Link : https://mahresult.nic.in, http://sscresult.mkcl.org, https://sscresult.mahahsscboard.in, https://results.targetpublications.org, https://results.digilocker.gov.in या संकेतस्थळांद्वारे निकाल पाहता येणार आहे.
-
(सर्व फोटो प्रतीकात्मक आणि लोकसत्ता संग्रहित)
Maharashtra 10th SSC Result 2024 : दहावीच्या निकालाची तारीख जाहीर; कुठे पाहाल निकाल?
Maharashtra 10th SSC Result 2024 Website Link : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
Web Title: Maharashtra ssc result maharashtra board ssc result 2024 date declared spl