जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत स्थान मिळवणारे मुकेश अंबानी व त्यांच्या पत्नी नीता अंबानी हे आलिशान लाइफस्टाइलसाठी नेहमीच चर्चेत असतात. नोकरांना दोन लाख रुपयांहून अधिक पगार देणाऱ्या मुकेश अंबानींची मुलं स्वत:चे रुम स्वत:च साफ करतात. नीता अंबानी यांनी एका मुलाखतीत याबद्दलचा खुलासा केला. 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत नीता अंबानी यांना मुलांविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. इतकी श्रीमंती असताना मुलांचे पाय जमिनीवर राहावेत यासाठी काय करता असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या, "मुकेश आणि मी मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो." "आकाश, अनंत आणि इशा हे अनेकदा आजी-आजोबांसोबत राहायला जायचे. त्यांच्याकडून तिनही मुलांना चांगली शिकवण मिळाली", असं त्यांनी सांगितलं. मुलांना वस्तूंची किंमत आणि श्रीमंतीची हवा डोक्यात जाऊ न देणं याची शिकवण देणं गरजेचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या शिकवणीमुळेच तिघंही आपला रुम स्वत:च साफ करतात, असंही त्यांनी सांगितलं.
नोकरांना लाखो रुपये पगार; तरीही आपला रुम स्वत: साफ करतात मुकेश अंबानींची मुलं
Web Title: Reliance owner mukesh ambani and nita ambani why akash anant and isha clean their room ssv