-
चेपॉकवर इंग्लंड विरुद्धच्या कसोटी विजयात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या अश्विन बरोबर त्याची पत्नी प्रिथी अश्विनची सुद्धा चर्चा आहे. (सर्व फोटो सौजन्य – प्रिथी अश्विन इन्स्टाग्राम)
-
नवऱ्याने काल शतक झळकवल्यानंतर चेपॉकच्या खेळपट्टीला नाव ठेवणाऱ्या इंग्लिश, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंची तिने आपल्या टि्वटमधून चांगलीच फिरकी घेतली. . ‘माझा नवरा प्रत्येकाला ट्रोल करतोय #win50’ असे तिने टि्वट मध्ये म्हटले होते.
-
सिडनी कसोटी अनिर्णीत राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अश्विनला पाठदुखीचा प्रचंड त्रास होत होता. पाठीत रविवारी रात्री असहाय्य वेदना होत होत्या, रात्री तो तसाच झोपला. सोमवारी सकाळी तर त्याला सरळ उभंही राहता येत नव्हतं. त्याला इतका त्रास होत होता की बूटांच्या लेस बांधण्यासाठीही तो वाकू शकत नव्हता. यासोबतच, इतका त्रास होत असतानाही अश्विनने केलेली कामगिरी पाहून चकित झाले असंही तिने म्हटलं होतं.
-
अश्विनला चांगल्या आणि वाईट वेळेत साथ देणाऱ्या प्रिथीची अश्विन बरोबर कधी भेट झाली? त्यांच्यात प्रेमाचे नाते कसे फुलत गेले? या बद्दल आपण जाणून घेऊया.
-
अश्विनच्या खासगी जीवनाबद्दल फार कमी जणांना माहित आहे. उंचपुरा, देखणा हँडसम दिसणारा अश्विन शांत राहणे जास्त पसंत करतो. एखाद्या बॉलिवूड चित्रपटाला शोभावी अशी त्याची लव्हस्टोरी आहे.
-
चेन्नई तामिळ भाषिक कुटुंबात अश्विनचा जन्म झाला. शाळेत असताना अश्विनची प्रिथी नारायणन बरोबर भेट झाली. शाळेत असताना दोघांची मैत्री बहरत गेली.
-
मैत्रीचा धागा इतका घट्ट झाला की, अश्विन आणि प्रिथीने एकाच कॉलेमध्ये प्रवेश घेतला.
-
चेन्नईच्या एसएसन कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये शिकत असताना त्यांच्यातील प्रेमसंबंध फुलत गेले.
-
अश्विनची क्रिकेट कारकीर्द आकाराला येत असताना त्याला प्रिथीला तितका वेळ देता येत नव्हता. पण प्रिथीने सुद्धा ते समजून घेतले. करीअर आणि खेळाबद्दलची त्याची जी पॅशन होती, त्याचा आदर केला.
-
दोघांच्या कुटुंबीयांनी मान्यता दिल्यानंतर १३ नोव्हेंबर २०११ रोजी दोघांनी लग्न केले. २०१५ मध्ये प्रिथीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. अखिरा असे त्यांनी मुलीचे नाव ठेवले.
-
२०१६ मध्ये अश्विनला दुसऱ्यांदा कन्यारत्न प्राप्त झाले. मी ‘कॅरम बेबी 2’ ची ‘डिलिव्हरी’ केली असे ट्विट प्रिथी अश्विनने २६ डिसेंबरला केले होते.
-
अश्विनला २१ डिसेंबर रोजी दुसरी मुलगी झाली. अश्विनची पत्नी प्रिथी हिने ही बाब सुमारे पाच दिवस सार्वजनिक केली नाही. त्याचे कारण म्हणजे आर. अश्विनला क्रिकेटर ऑफ द इअर हा महत्त्वपूर्ण पुरस्कार मिळाला होता.
-
मुलगी जन्मल्याची घोषणा केली असती तर सर्व जण मुलीच्या जन्माच्या आनंदातच वावरले असते आणि क्रिकेटर ऑफ द इअरचा आनंद काहीसा बाजूला पडला असता असे तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.
-
गंमत म्हणजे अश्विनच्या पत्नीने ज्या दिवशी मुलीला जन्म दिला त्याच्या एक दिवस आधी ती चेपॉक स्टेडियमवर चेन्नई विरुद्ध इंग्लंड हा सामना पाहण्यासाठी आली होती.
-
सामना पाहताना मी इतकी उत्तेजित झाले होते की मला वाटले मी इथेच बाळाला जन्म देते की काय? ती तर एक दुसरी आख्यायिकाच ठरली असती असे तिने म्हटले होते.
मैदानाबाहेर राहूनही प्रतिस्पर्ध्यांची विकेट काढणारी प्रिथी अश्विन आहे तरी कोण?
Web Title: India vs england r ashwins wife prithi ashwin know about her dmp