-
औरंगाबादमध्ये ढोकळा, फाफडा, जिलेबीचे वाटप करुन भाजपकडून विजयाच सेलिब्रेशन करण्यात आलं
-
दिल्लीमध्ये भाजपच्या मुख्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जंगी सेलिब्रेशन केले
-
भाजपचीच सत्ता असणाऱ्या मध्य प्रदेशमध्ये ढोकळा, फाफडा, जिलेबी या गुजराती पदार्थांचे वाटप करुन विजय साजरा करण्यात आला
-
मुंबईमधील भाजपच्या कार्यालयासमोर खास मराठमोळ्या पद्धतीने ढोल ताशांच्या गजरावर नाचत भाजप कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला
-
दिल्लीमधील भाजपच्या मुख्यालयासमोरील कार्यकर्त्यांची गर्दी
-
मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारही मुंबईमधील भाजपच्या कार्यालयासमोरील भाजप कार्यकर्त्यांच्या आनंदोत्सवामध्ये सहभागी झाले
-
पुण्यामध्ये खास 'पुणेरी पद्धतीने' गुगाल उडवून ढोल ताशांच्या गजरात नाचत भाजप कार्यकर्त्यांनी जंगी सेलिब्रेशन केले
-
मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आनंद व्यक्त करत भाजपचा झेंडा फडकवताना
-
मुंबईमधील भाजपच्या कार्यालयासमोर महिला कार्यकर्त्यांनी 'मोदी… मोदी..' नावाच्या घोषणा देत आनंद साजरा केला
-
मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारही मुंबईमधील भाजपच्या कार्यालयासमोरील भाजप कार्यकर्त्यांच्या आनंदोत्सवामध्ये सहभागी झाले
-
हिमाचल प्रदेशमध्ये एकहाती सत्ता मिळवणाऱ्या भाजपच्या विजयाचा आनंदोत्सव स्थानिक कार्यकर्त्यांनी अशाप्रकारे साजरा केला
-
दिल्लीमधील महिला कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयासमोर फुलबाजे उडवून पक्षाच्या विजयाचा आनंद साजरा केला
-
फोटो: भाजपच्या विजयानंतर ढोकळा, फाफडा आणि… सेलिब्रेशन!
भाजपच्या या दमदार विजयाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील भाजप कार्यकर्त्यांनी जंगी सेलिब्रेशनला सुरुवात केली आहे. देशभारतील अनेक शहरांमध्ये भाजप कार्यकर्ते ‘गुजरात स्टाईल’ सेलिब्रेशन करताना पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी गुजरामधील लोकप्रिय खाद्यपदार्थ असणाऱ्या ढोकळा,फाफडा, जिलेबीचे वाटप करुन ढोल ताशांच्या गजरात हा विजय साजरा केला जात आहे. याच विजयोत्सवाचे काही खास फोटो पाहा या फोटोगॅलरीच्या माध्यमातून…
Web Title: Bjp workers celebrate at different cities as trends indicate partys victory in both himachal and gujarat