-
दिलासा मिळेल : चंद्र ग्रहाचे लाभस्थानातून होणारे भ्रमण शुभ फलदायी ठरेल. २ जून रोजी मंगळ कर्क या राशीत चतुर्थ स्थानी प्रवेश करेल. कोणत्याही गोष्टीचा गाजावाजा करणे टाळा. महत्त्वाच्या गोष्टींवर आताच चर्चा करणे फायद्याचे ठरणार नाही. त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. व्यवसायात बदलती स्थिती असेल. मात्र नको त्या ठिकाणी धाडस वाढवू नका. भागीदारी व्यवसायात नव्याने सुरुवात करणे टाळा. नोकरदार वर्गाचा अडचणींचा कालावधी कमी होईल. कामाची घडी सुरळीत चालू झाल्याने वेळेचे नियोजन करावे लागेल. आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळेल. राजकीय क्षेत्रात वादाच्या मुद्द्याला हात घालू नका. मित्रपरिवाराची मदत मिळेल. घरगुती स्तरावर ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्या. प्रकृती उत्तम राहील. शुभ दिनांक : १, २ महिलांसाठी : विशेष कार्यप्रणाली जागृत होईल. (स्मिता अतुल गायकवाड)
-
आनंदी वातावरण राहील : भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे भ्रमण करणारा चंद्र इच्छित फलप्राप्ती करून देणारा ठरेल. आजचे काम उद्या असा फळ देणारा कालावधी संपून जाईल. रखडलेल्या कामांना गती मिळेल. व्यावसायिक घोडदौड वाढलेली असेल. उत्पन्नातून फायदा मिळेल. गुंतवणूक योग्य कारणी लागेल. नवीन योजना राबविण्यात यश मिळेल. नोकरदार वर्गाला बढतीसाठी प्रयत्न करावे लागणार नाहीत. संधी चालून येईल. अनपेक्षित असा भाग्योदय होईल. आर्थिक बाजू भक्कम राहील. राजकीय क्षेत्रातील ताणतणाव कमी होतील. नवीन ओळखीचा फायदा होईल. मित्रांची मदत मिळेल. मुलांच्या भवितव्यासाठी आगामी काळाची तरतूद चांगल्या पद्धतीने करता येईल. घरगुती वातावरण आनंदी राहील. आध्यात्मिक गोष्टींचा पगडा कायम राहील. मनोबल वाढेल. प्रकृतीस्वास्थ्य ठणठणीत राहील. शुभ दिनांक : ३०, ४ महिलांसाठी : कष्टाचे चीज करा.
-
गती वाढेल : दिनांक ३० व ३१ या दिवशी चंद्राचे भ्रमण अष्टमस्थानातून होत आहे. या दिवशी मात्र कोणतीही गोष्ट सबुरीने घेतलेली बरी. विचारात्मक कृतीवर भर द्या. त्यानंतर चंद्राचे भ्रमण भाग्यस्थानातून पुढे होईल. या कालावधीत बऱ्याच कामाची गती वाढेल. व्यावसायिक कसर भरून काढाल. टप्प्याटप्प्याने का होईना, गुंतवणूक करणे इष्ट ठरेल. आवक वाढविण्याचा कल यशस्वी राहील. नोकरदार वर्गाची संभ्रमित अवस्था होणार नाही. हिशोबाच्या नोंदीची जबाबदारी मात्र इतरांवर सोपवू नका. कामाच्या बाबतीत गती वाढेल. आर्थिक बाबींची काळजी कमी झाली तरी खर्चावर निर्बंध ठेवावे लागतील. राजकीय क्षेत्रात वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळेल. नातेवाईकांशी जवळीकता साधने शक्य नसले तरी संपर्कात राहाल. जुन्या व्याधींकडे लक्ष द्या. शुभ दिनांक : १, २ महिलांसाठी : सैरभैर झालेले मन सावरा.
-
जबाबदारी स्वीकारा : दिनांक १, २ रोजी चंद्र अष्टमस्थानात भ्रमण करत आहे. या दोन दिवशी मात्र निवडक गोष्टींना प्राधान्य द्या. द्विधा अवस्थेतला निर्णय घाईने घेऊ नका. शांत मनाने विचार करा. त्यानंतरचा कालावधी हा स्थिरस्थावर स्थिती निर्माण करेल. व्यवसायात सुरुवातीला अवघड वाटणारी गोष्ट सोपी होऊ लागेल. गुंतवणूक करताना वाटणारी भीती कमी होईल. अपेक्षित फलप्राप्ती व्यवसायातून दिसून येईल. नोकरदार वर्गाला मनातील संकल्पना सध्या बाजूला ठेवाव्या लागतील. योग्य मुद्दे ठरवून मांडणी करावी लागेल. कामातील जबाबदारी स्वीकारा. आर्थिक चणचण भासणार नाही. राजकीय क्षेत्रात बदलत्या स्वरूपाची घडामोडी होतील. नातेवाइकांशी संवाद साधाल व धार्मिक गोष्टींच्या कार्यक्रमाचे आयोजन आखाल. आहाराचे पथ्य पाणी सांभाळा. शुभ दिनांक : ४, ५ महिलांसाठी : मनाची लवचीकता वाढेल.
-
लक्ष केंद्रित करा : षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. तारेवरची कसरत अजूनही संपलेली नसली, तरी प्रयत्न सोडून चालणार नाही. परिश्रमाचे फळ उशिरा का होईना मिळेल. त्यासाठी चिंता वाढवू नका. व्यवसायामध्ये अनेक गोष्टींऐवजी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. नेहमीप्रमाणेची घाई आता योग्य नाही. स्वत:च्या हिमतीवर उभा केलेला डोलारा सावरण्यासाठी धीर धरा. नोकरदार वर्गाला जुन्या अनुभवातून मिळालेले मार्गदर्शन मोलाचे ठरेल. संशोधन कार्य क्षेत्रात वेगवेगळ्या बाबींचा विचार करावा लागेल. आर्थिक बाबतीत आधी खर्चाचे नियोजन ठरवा. त्यामुळे तारांबळ उडणार नाही. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा पणाला लावून कोणतेही कार्य करू नका. कौटुंबिक वादविवादापासून लांब राहा. शारीरिकदृष्ट्या हलगर्जीपणा टाळा. शुभ दिनांक : १, २ महिलांसाठी : स्वत:हून इतरांना सल्ला देऊ नका.
-
चिंतामुक्त राहा : ग्रहांचे पाठबळ सध्या पूरक नसले तरी वाईटही नाही. परिस्थितीत बदल घडवून आणण्याचे ठरवले तरी तांत्रिक अडचणी लक्षात घ्या. व्यावसायिकदृष्ट्या गांभीर्य लक्षात ठेवा. विचार करून कृती करा. हळूहळू का होईना परिस्थिती साथ देऊ लागेल. भागीदारी व्यवसायात न पडलेले चांगले. उधार उसनवारीचे व्यवहार टाळा. आगामी काळाचा विचार करून आताच हतबल होऊ नका. चिंतामुक्त राहा. नोकरदार वर्गाने वरिष्ठांविषयी असलेला गैरसमज दूर करा. स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संधीची वाट पाहा. आर्थिकदृष्ट्या जम कसा बसेल याकडे लक्ष द्या. सार्वजनिक ठिकाणी मनस्ताप होणाऱ्या गोष्टींमध्ये पडू नका. घरगुती वातावरण तप्त होणार नाही याची काळजी घ्या. आरोग्याबाबतीत सतर्क राहिलेले चांगले. शुभ दिनांक : ३०, ३१ महिलांसाठी : कामात मग्न राहाल.
-
प्रयत्न सफल होतील : पंचम स्थानातील गुरू,नेपच्युन, चंद्र यांचा शुभयोग दूरदृष्टीपणा वाढवण्यास मदत करेल. ठरवलेला युक्तिवाद कामी येईल. व्यवसायात होणारी धरसोड वृत्ती कमी होईल. भागीदारी व्यवसायात समजुतीच्या संवादाने मिळतेजुळते घ्यावे लागेल. रखडलेल्या गोष्टी पुढे सरकतील याकडे लक्ष द्या. विविध स्तरावरून आलेले प्रस्ताव स्वीकारायला हरकत नाही. कामकाजातील प्रयत्न सफल होतील. नोकरदार वर्गाने वरिष्ठांशी हुज्जत न घालता कामाकडे लक्ष केंद्रित करा. नेहमीप्रमाणेच संपूर्ण जबाबदारी तुमच्यावर पडेल. आर्थिक चक्र सुरळीत चालू ठेवण्यासाठी नियोजन करावे लागेल. राजकीय क्षेत्रात जेवढ्यास तेवढे राहिलेले चांगले. मुलांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळेल. त्याचे समाधान लाभेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करा. कोणतेही दुखणे अंगावर काढू नका. शुभ दिनांक : १,२ महिलांसाठी : उत्साह टिकवून ठेवा.
-
शुभ संकेत मिळतील : ग्रहांची अनुकूलता उत्तम असेल. ज्याच्यातून काही समाधान नाही अशा विचारात गुंतणे आता कमी होईल. प्रत्येक गोष्टीचा समतोल साधणे अवघड जाणार नाही. स्वतङ्ममध्ये बदल करून राहण्याचा निर्णय योग्य असेल. अवतीभवतीचा विचार करणे टाळा. व्यवसायातील देवाणघेवाण चालू होईल. व्यवसायातील बौद्धिक ताण कमी झाल्याने कामातील उत्साह वाढेल. इतरांवर अवलंबून राहण्याचा कालावधी संपून जाईल. नियोजित गोष्टी घडतील. नोकरदार वर्गाला अधिकार प्राप्त होईल. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. आर्थिकदृष्ट्या शुभसंकेत मिळतील. राजकीय क्षेत्रात तुमच्या शब्दाला वजन असेल. ठरवलेले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहा. नवी ओळख होईल. उपासनेत मन रमेल. मनोबल वाढेल. प्रकृतिस्वास्थ्य ठणठणीत राहील. शुभ दिनांक : ४, ५ महिलांसाठी : बचतीतून फायदा होईल.
-
कौटुंबिक सौख्य लाभेल : स्वतःचेच खरे करण्याची किमया तुमच्यामध्ये आहे. ते साध्य करणे उत्तम जमेल. कोणत्याही गोष्टीचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय शांत न राहणे हे सूत्र बाजूला ठेवा. एकजुटीने निर्णय कसा घेता येईल याकडे लक्ष द्या. व्यावसायिक प्रश्न कमी होऊ लागतील. मोठ्या गुंतवणुकीची योजना आताच राबवू नका. मागील कमतरता भरून काढण्यासाठी प्रयत्नशील राहा. नोकरदार वर्गाला वरिष्ठांमार्फत होणारा लाभ समाधान मिळवून देईल. जबाबदारी वाढल्याने कामकाज पूर्णवेळ व्यस्त असेल. डोक्यावर झालेले कर्जाचे ओझे बऱ्यापैकी कमी होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्त्व खुलून येईल. कौटुंबिक क्षेत्रात सौख्य लाभेल . धार्मिक गोष्टीतील उत्साह वाढेल. शारीरिक यष्टी मजबूत असेल. शुभ दिनांक : २,३ महिलांसाठी : स्पष्ट बोलणे टाळा.
-
परिवर्तन घडेल : प्रत्येक पाऊल संयमाने टाकल्याने योग्य मार्ग सुचेल. निराशाजनक स्थिती बदललेली असेल. व्यवसायात असलेली गैरसोय कमी होईल. मात्र नियोजनाचा अभाव बिघडू देऊ नका. उत्पादनात वाढ करताना चढ-उतार लक्षात घ्या. वनस्पतिजन्य व्यवसायात साठवण करू नका. आवश्यक तेवढी साठवण करा. आवाक्याबाहेर कोणतीही गोष्ट करू नका. नोकरदार वर्गांची अस्थिरता कमी होईल. कामाचा व्याप नीट समजून घ्या. नियोजनात्मक गोष्टींची अंमलबजावणी करा. राजकीय क्षेत्रात वरिष्ठांचे बदलते निर्णय स्वीकारावे लागतील. भावंडांशी हितगूज केलेल्या संवादातून आनंद वाढेल. जुन्या गोष्टींना उजाळा मिळेल. कौटुंबिकदृष्ट्या परिवर्तन घडेल. आध्यात्मिक गोष्टीतून मानसिक स्थिरता येईल. आरोग्याबाबतीत काळजी वाटणार नाही. शुभ दिनांक : ३०,३१ महिलांसाठी : कामामध्ये व्यस्त राहाल.
-
व्यवहाराला महत्त्व द्या : सप्ताहाच्या पूर्वार्धात चंद्र व्ययस्थानातून भ्रमण करत आहे. या कालावधीत इतरांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. गाफीलपणे कोणतेही निर्णय घेणे टाळा. नियम व अटींचे पालन करा. व्यवसायात दुहेरी भूमिका बाजूला ठेवा. रोखठोक व्यवहाराला महत्त्व द्या. वैद्यकीय क्षेत्रातील तांत्रिक अडचणी कमी होऊ लागतील. विविध क्षेत्रात पदार्पण करणे सहज शक्य होईल. नोकरदार वर्गाला उद्याचे कामही आजच करावे लागेल. मनाची तयारी करा. आळस झटकून कामाला लागा. कोणत्याही गोष्टींचा पाठपुरावा करणे आवडत नसले तरी, कामासाठी करावे लागणार आहे. वेळेचे बंधन न ठेवता सतत कार्यरत राहावे लागेल. आर्थिकदृष्ट्या खर्च कमी करा. सामाजिक क्षेत्रात उत्साह वाटणार नाही. कुटुंबाची जबाबदारी योग्यरीत्या पार पाडाल. आरोग्य चांगले राहील. शुभ दिनांक : १,२ महिलांसाठी : तुमचे विचार इतरांना पाठवून देताना, शब्दप्रयोग जपून वापरा.
-
नव्याने सुरुवात होईल : बारीकसारीक गोष्टींचा नकारार्थी विचार टाळा. कामे वेळेत पूर्ण न झाल्याने चिडचिड होईल. कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आळस बाजूला ठेवा. कोणत्या कामामुळे त्रास होतो, त्या कामाचे वेळापत्रक आधी तयार करा. छोट्या व्यवसायाचे स्वरूप कलाटणी देणारे आहे. अपेक्षेप्रमाणे फळ मिळेल. बदललेले स्वरूपसुद्धा यशाचा प्रकाश पाडेल. नोकरदार वर्गांची न सुटणारी कोडी उलगडतील. कामात असणारी गैरहजेरी कमी होईल. पुन्हा नव्याने सुरुवात होईल. ओळखीचा उपयोग करून घ्या. आर्थिकदृष्ट्या स्थिती चांगली असली तरी, खर्चाची यादी मात्र तूर्तास बाहेर काढू नका. राजकीय क्षेत्रात मित्रपरिवाराचे प्रोत्साहन मिळेल. कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्तींच्या बाबतीत आशेचा किरण दिसेल. आरोग्याबाबतीत हेळसांड करू नका. शुभ दिनांक : ४,५ महिलांसाठी : नवीन गोष्टी करण्याची उत्सुकता वाढेल.
आठवड्याचं राशीभविष्य… कोणत्या राशींच्या लोकांसाठी हा आठवडा ठरणार फलदायी?
weekly horoscope in marathi : साप्ताहिक राशीभविष्य… कशी असणार ग्रहांची स्थिती… पुढील आठवडा कसा जाणार?
Web Title: Weekly horoscope in marathi astrology in marathi marathi horoscope rashi bhavishya in marathi weekly rashi bhavishya bmh