धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा ‘धर्मवीर पुरस्कार’ ज्येष्ठ समाजसेवक डॉ. भीमराव गस्ती यांना जाहीर झाला आहे. १४ मे रोजी संभाजी महाराजांच्या जयंती दिनी बालगंधर्व रंगमंदिर येथे पुरस्काराचे वितरण होणार आहे. अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास चोरगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी विश्वस्त सुरेश नाशिककर व सचिव जितेंद्र गाडे उपस्थित होते. पुरस्काराचे वितरण खासदार आनंद अडसूळ यांच्या हस्ते व ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. ५१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. भीमराव गस्ती हे गेली ३५ वर्षे देवदासी प्रथेविरुद्ध प्रबोधनाचे कार्य करत आहेत. त्यांच्या आजपर्यंतच्या कार्याची दखल घेत त्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 07-05-2013 at 02:17 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dharam veer awards announced to dr bhimrao gasti